तरुण भारत

कर्नाटकात गुरुवारी ११४३ बाधितांची नोंद

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात, गुरुवारी नवीन १,१४३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर १,२६८ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. दरम्यान राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९,१३,४८३ वर पोहोचली आहे. यापैकी ८,८७,८१५ रुग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. राज्यात सध्या १३,६१० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण १२,०३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू गुरुवारी झाला आहे. गुरुवारी कर्नाटकमधील रिकव्हरीचे प्रमाण ९७.१९ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.३१ टक्के होते.

आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासात १०,६५८ जलद प्रतिजैविक आणि ८८,०६६ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ९८,७४२ नमुन्यांची तपासणी केली.

दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी ६४२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यत संक्रमित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३,८५,००८ वर पोहोचली असून यापैकी ३,७१,८७९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान जिल्ह्यात सध्या ८,८४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आताप्रयत्न ४,२८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

आरक्षणाच्या मागण्यांसाठी नेमलेली समिती व्यर्थ असल्याची भाजप आमदाराची टीका

Abhijeet Shinde

बेंगळूर विमानतळावर २९ व्हेंटिलेटर दाखल

Abhijeet Shinde

मंगळूर येथे ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

Abhijeet Shinde

कर्नाटक: भाजप नेते नाराज आमदारांची घेणार स्वतंत्र भेट

Abhijeet Shinde

बेंगळुरात एनआयएचे 43 ठिकाणी छापे

Omkar B

राज्यात शुक्रवारी २६ हजाराहून अधिक बाधितांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!