तरुण भारत

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

ऑनलाईन टीम / हैद्राबाद : 


दाक्षिणात्य सुपर‍स्‍टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

Advertisements


रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच रोखण्यात आले होते. कारण क्रूमधील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला चेन्नईमधील आपल्या फार्महाऊसमध्ये क्वॉरन्टाईन केले होते. 


दरम्यान, अन्नाथे या चित्रपटाचे दिग्दर्शन सिरुथई सिवा करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नयनतारा आणि किर्ती सुरेश महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत. रजनीकांत आगामी 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

Related Stories

सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; शार्प शूटर राहुलला उत्तराखंडातून अटक

pradnya p

शहराचा भूतकाळ दाखवणारा द स्पायरल

Patil_p

चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन

triratna

शशांकचा चढला पारा

Patil_p

बिग बी यांनी लाडक्या लेकाला अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा!

pradnya p

मिस वर्ल्ड स्पर्धेची मजेशी कहाणी मिसबिहेवियर

Patil_p
error: Content is protected !!