तरुण भारत

संसद बरखास्त केल्यामुळे नेपाळ सरकारला कारणे दाखवा नोटीस

ऑनलाईन टीम / काठमांडू : 

संसद बरखास्त करण्याच्या निर्णयावरून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रविवारी राष्ट्रपती विद्या भंडारी यांनी पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांच्या शिफारशीवर संसद बरखास्त करून मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली होती.

Advertisements

पंतप्रधान ओली यांनी संसदीय मंडळ, केंद्रीय समिती आणि पक्ष सचिवालय येथे बहुमत गमावले आहे. त्यांनी यावर उपाय शोधण्याऐवजी 20 डिसेंबरला तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात संसद बरखास्त करण्याच्या शिफारशीचा निर्णय घेतला. राष्ट्रपतींनीही संसद बरखास्त करण्याची शिफारस मान्य केली. दरम्यान, अशा प्रकारे संसद बरखास्त करण्याची घटनेत तरतूद नाही. त्यामुळे न्यायालयाने नेपाळ सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Related Stories

लसीकरणाचा वेग कमी होऊ नये यासाठी राज्यांना जागरूक करण्याची गरज

Rohan_P

कोल्हापूर : आजी-माजी मुख्यमंत्री पूर पाहणी दौऱ्यावेळी आमने -सामने

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मादळेत आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

केंद्र सरकार १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार; पीएम मोदींची मोठी घोषणा

Abhijeet Shinde

सचिन वाझे मुंबई पोलीस दलातून बडतर्फ

Rohan_P

थ्री इडियट्सवाल्या ‘रँचो’ची कमाल

Patil_p
error: Content is protected !!