तरुण भारत

सांगली : शिपूरमध्ये काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षावर हल्ला

निवडणुकीच्या कारणातून वाद, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप


प्रतिनिधी / मिरज

Advertisements


मिरज तालुक्यातील शिपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून काँग्रेस तालुका उपाध्यक्षावर हल्ला करण्यात आला. पोपट तुकाराम बाबर असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निवडणकीतील वादातून भाजपा कार्यकर्त्यांच्या जमावाने हा जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.

मिरज तालुक्याच्या 22 ग्रामपंचायतीत निवडणूक सुरु आहे. दोन दिवसांपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शिपूर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षाकडून उमेदवार आहेत. गावातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तोपर्यंत राजकीय गटबाजी उफाळून आली आहे. शुक्रवारी गावात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. ग्रामपंचायतीतीमधील राजकीय वैमनस्यातून पोपट तुकाराम बाबर या तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षावर जमावाने हल्ला केला.

दरम्यान, भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच दगड, लाठीकाठी घेऊन मारहाण करुन बाबर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. बाबर हे जखमी झाल्याने त्यांना सांगली येथील पद्मविभूषण वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला कशामुळे झाला, कोणी केला, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Related Stories

वाळव्यासाठी प्रदीप उबाळे नवे तहसीलदार

Abhijeet Shinde

सांगली : लॉकडाऊन करण्यापूर्वी गरिबांच्या पोटापाण्याची सोय करा : आमदार पडळकर, सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde

जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत विकासासाठी ‘व्हिजन सांगली@75’ फोरमची स्थापना

Abhijeet Shinde

सांगली : भगवान महावीर कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Abhijeet Shinde

सांगली : नाना पटोले यांच्याकडून वसंतदादा पाटील यांना अभिवादन

Abhijeet Shinde

सांगली : वैद्यकीय क्षेत्रातील रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन वेबीनार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!