तरुण भारत

कोरोनामुळे जगभरात ख्रिसमसच्या आनंदावर विरजण

बेथलहॅममध्येही इतिहासात प्रथमच आनंदसोहळा प्रभावित  

कोरोनाच्या सावटामुळे यंदा जगभरात ख्रिसमसचा उत्साह झाकोळला गेल्याचे दिसून आले आहे. मध्यपूर्वेतील बेथलहॅम या येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थानी ख्रिसमच विषेश उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येतो. तथापि, यंदा इतिहासात प्रथमच येथे या उत्साहाची करतरता दिसून आली. नेहमीप्रमाणे लोक रस्त्यावर मोठय़ा संख्येने आले. तथापि नेहमीचा आनंद आणि जोष यांचे दर्शन घडले नाही. नाचगाणी, खरेदी आणि आनंद व्यक्त करण्याचे इतर मार्ग कोरोनामुळे संकुचित झाल्याचे अनुभवास आले. लोकांनी अंतर राखूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Advertisements

गुरूवारी जगाच्या अनेक भागांभध्ये ख्रिसमस साजरा करण्यात आला. तथापि, बेथलहॅमसारखेच दृष्य सर्वत्र होते. अनेक देशांमध्ये सामुहिक प्रार्थना आणि आनंदोत्सवावर पूर्णतः बंदीच घालण्यात आली होती. तसेच अनेक देशांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने लोकांना ख्रिसमसची खरेदी करता आली नाही.

लहान मुले नाराज

दरवर्षी ख्रिसमस ही लहान मुलांसाठी आनंदाची पर्वणीच असते. यंदा मात्र कोरोनामुळे मुलांसह मोठय़ांना घरातच हा सण साजरा करावा लागला. एकमेकांना शुभेच्छा केवळ मोबाईलवरून द्याव्या लागल्या. 

युरोपात विशेष निर्बंध

ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी आणि स्कँडिनेव्हीयन देश येथे शेकडो वर्षांपासून ख्रिसमस हा राष्ट्रीय सण आहे. पण यंदा या देशांमध्ये नागरीकांवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ब्रिटनमध्ये तर लॉकडाऊनच्या घोषणेने ख्रिसमसच्या दिवशी नेहमीच असणारी गजबज नव्हती. जर्मनीच्या प्रशासनाने नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते.

इटलीत महत्वाच्या शहरांमध्ये रस्त्यावर तुरळक गर्दी होती. काही ठिकाणी लोक कोरोनाची भीती तोडून मोठय़ा संख्येने रस्त्यावर आले. मात्र, त्यांना सरकारचे नियम पाळावेच लागले. त्यामुळे सण म्हणतात, तसे काही झालेच नाही, अशी नाराजी अनेकांनी व्यक्त केली. शेवटी परिस्थितीशी जुळवून घ्यावेच लागते, असे हताश उद्गार अनेकांच्या तोंडून निघत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी नोंदविले आहे.

अथेन्समध्ये शांत शांत…

ख्रिसमस साजरा करण्याचा अठराशे वर्षांचा इतिहास असणारी ग्रीस देशाची राजधानी अथेन्स या ऐतिहासिक शहरात ख्रिसमच्या कालखंडात प्रथमच सारे काही शांत शांत होते. असा मूक ख्रिसमस कधीच अनुभवला नाही, अशी प्रतिक्रिया बुजुर्गांकडून व्यक्त होत असल्याचे अनेक पत्रकारांनी नोंद केले.

युरोपात अनेक स्थानी तर ख्रिसमस आनंदोत्सव पूर्णतः बंदच ठेवण्यात आला होता.

Related Stories

जगात वेगाने फैलावतोय नवा जीवघेणा आजार

Patil_p

अल्प प्रतिसादाने लसीचा साठा फेकण्याची वेळ

Patil_p

ही अंतिम महामारी नाही

Patil_p

काबूल विमानतळ स्फोट ; याचा हिशेब चुकता करु : जो बायडेन

Abhijeet Shinde

पाक : रुग्ण वाढले

Omkar B

नेपाळमुळे बिहारला पूरस्थितीचा धोका

datta jadhav
error: Content is protected !!