तरुण भारत

वनप्लसचा नवा अनोखा 8 टी फोन बाजारात

नवी दिल्ली : चिनी कंपनी वनप्लसने 8 टी कॉन्सेप्टचा नवा स्मार्टफोन नुकताच बाजारात दाखल केला आहे. यात ऑल न्यू बॅक पॅनेल दिलेली आहे ज्यावर एक फिल्म बसवण्यात आली असून पॅनलचा रंग एकसारखा बदलतो. डार्क ब्लू रंगाचे पॅनेल लाइट सिल्वर रंगात परावर्तीत होते. रंग बदलण्याच्या ही अनोखी क्रिया अनेकांना भावते आहे. सदरचा नवा स्मार्टफोन हा जवळपास 39 डिझाइनरांनी एकत्र येऊन तयार केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या प्रकारचे बॅक कव्हर ग्लासचे आहे. यात मेटल ऑक्साइड असल्याने बॅककव्हरवरचा रंग बदलतो. या फोनला एक एमएमव्हेव रडार मॉडय़ुल असून ज्यायोगे इलेक्ट्रॉनिक वेव्हस (लहरी) प्रसारीत होतात आणि शोषल्या जातात. सदरच्या फोनची किंमत 42 हजारावर असणार असल्याचे सांगितले जाते. 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची सोय या आधुनिक स्मार्टफोनमध्ये असणार आहे. एक आहे की या स्टोरेजची क्षमता यापेक्षा अधिक वाढवता येत नाही. क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 865 ची चिपसेट ऑक्टो कोर प्रोसेसरसह हा फोन येणार असून 4 हजार 500 एएमएचची बॅटरी याला असणार आहे.

गेमिंगची आवड असणाऱयांना हा फोन नक्कीच आवडणारा असेल, असे कंपनीने म्हटले आहे. पण ग्राहकांना 5 जी, 4 जी व्होल्टे, वायफाय 802, मोबाइल हॉटस्पॉट यासारख्या सुविधा यावर मिळू शकणार आहेत.

Advertisements

Related Stories

गुगल-फोर्ड यांच्यात भागीदारी

Patil_p

पारदर्शक स्मार्ट टीव्ही शाओमीकडून सादर

Patil_p

रुची सोयाचे भविष्य पतंजलीने बदलले

Patil_p

आला 7000 एमएएच बॅटरीचा मोबाईल

Patil_p

सेबीच्या मंजुरीनंतर दोन महिन्यात व्यवहार : किशोर बियानी

Omkar B

नवी इनोव्हा क्रिस्टा बाजारात दाखल

Omkar B
error: Content is protected !!