तरुण भारत

एप्रिल-सप्टेंबरमध्ये डीमॅट खात्यांमध्ये दुप्पट वाढ

सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीतून माहिती : कोरोना संकटामुळे शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा कल

वृत्तसंस्था / मुंबई 

Advertisements

लॉकडाऊनच्या कारणामुळे देशासह जगभरात आर्थिक संकटाचे सावट निर्माण झालेले आहे. याच्याविरुद्ध बाजूला मात्र शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ नोंदवण्यात येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामध्ये चालू वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीत 63 लाख नवीन डीमॅट खाती उघडली आहेत. ज्याची मागणी वर्षात समान कालावधीत ही 27 लाख इतकी आहे. म्हणजे वर्षाच्या आधारे ही वाढ 133 टक्क्यांवर राहिल्याची नोंद केल्याची माहिती सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)यांच्या माहितीतून देण्यात आली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिल ते सप्टेंबरच्या दरम्यान महिन्याच्या पातळीवर प्रति महिन्याला 10 लाखपेक्षा अधिक नवीन डीमॅट खाती उघडण्यात आली आहेत. सेबीच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 4.44 कोटी डीमॅट खाती आहेत. मार्चमध्ये समाप्त झालेल्या मागील आर्थिक वर्षात हा आकडा 3.59 कोटी राहिला होता. 

महिलांची हिस्सेदारी वाढली

चालू वर्षात उघडण्यात आलेल्या डीमॅट खात्यांमध्ये महिलांची हिस्सेदारी ही वेगाने वाढत आहे. स्टॉक ब्रोकिंग कंपनी जिरोधा यांचे सह संस्थापक निखिल कामत यांनी एका ठिकाणी माहिती देताना म्हटले आहे, की नवीन गुंतवणूकदारांमध्ये महिलांची हिस्सेदारी मजबूत होत आहे. कोविड19 संकटाच्या प्रारंभापासून आतापर्यंत कंपनीसोबत 15 लाख पेक्षाही अधिक नवीन गुंतवणूकदारांची खाती उघडण्यात आली आहेत. ज्यामध्ये 2.35 लाख खाती ही महिलांनीच उघडली असून यातील महिलांचे सरासरी वय हे 33 वर्षे आहे.

नवीन खातेदारांचा बाजारावर प्रभाव

शेअर बाजार हा सात आठवडय़ांमध्ये वाढीसोबत बंद झाला आहे. याचदरम्यान सेन्सेक्स 47 हजार आणि निफ्टीने आपला टप्पा हा 13,700 चा विक्रमी स्तर पार करत कार्यरत राहिल्याची माहिती आहे. सदरचा विक्रम प्राप्त करण्यासाठी शेअर बाजाराला विदेशी गुंतवणूकदारांसोबत देशातील गुंतवणूकदारांची मोठी मदत झाली आहे. या अगोदरच्या तुलनेत देशातील संस्थात्मक गुंतवणूकीची (डीआयआय) हिस्सेदारी मजबूत स्थितीत राहिल्याची नोंद आहे.

बाजारात गुंतवणूकदारांचा वाढता कल

आर्थिक वर्ष        एकूण डीमॅट खाती            नवीन डीमॅट खाती

2020………….. 4.44 कोटी……… 63 लाख

2019………….. 3.59 कोटी……… 40 लाख

2018………….. 3.19 कोटी……… 40 लाख

2017………….. 2.79 कोटी……… 28 लाख

2016………….. 2.52 कोटी……… 18 लाख

2015………….. 2.33 कोटी……… 15 लाख

2014………….. 2.18 कोटी……… 9 लाख  

2013………….. 2.09 कोटी……… 10 लाख

2012………….. 1.99 कोटी……… 9 लाख

2011………….. 1.90 कोटी……… 3 लाख

(एप्रिल ते सप्टेंबर 2020 कालावधीतील आकडेवारी)

नवीन डीमॅट खाती का वाढताहेत?

  • लॉकडाऊन वातावरणाचा प्रभाव
  • समभागांच्या किमती बेसिक मूल्याच्या खाली
  • अन्य गुंतवणुकीपेक्षा मजबूत परताव्याचे संकेत
  • डीमॅट खाती उघडण्याची सोपी प्रक्रिया

Related Stories

सॅमसंगला दुप्पट मोबाईल विक्रीचा विश्वास

Patil_p

चलनवृद्धी नियंत्रणाचे यांत्रिक धोरण

tarunbharat

सेन्सेक्स, निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद

Patil_p

टेस्लाचा एस अँड पी मध्ये लवकरच समावेश

Patil_p

एचडीएफसी बँकेची नफा कमाई 7.51 हजार कोटीच्या घरात

Omkar B

स्मार्टफोन कंपनी रियलमीचा टीव्ही येणार

Patil_p
error: Content is protected !!