तरुण भारत

नव्या स्ट्रेनचा फ्रान्समध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनचा फ्रान्समध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. 

फ्रेंचच्या ट्युरस शहरात कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनने संक्रमित रुग्ण सापडला आहे. तो ब्रिटनहून 19 डिसेंबरला परतला होता. या रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. 21 डिसेंबरला त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. या रुग्णाला त्याच्याच घरात होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाचा नवा स्ट्रेन पहिल्यांदा ब्रिटनमध्ये आढळल्याने ब्रिटनमधील वाहतुकीवर 50 हून अधिक देशांनी निर्बंध आणले आहेत. 

Related Stories

दक्षिण कोरिया दौऱयावर सैन्यप्रमुख

Patil_p

पाकिस्तान अन् तुर्कस्तानला चांगलेच सुनावले

Amit Kulkarni

उत्तर कोरियातील तुरुंग सर्वात धोकादायक

Patil_p

जगभरात मागील 24 तासात 2.85 लाख नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

स्पेनची मारिया काशीमध्ये संस्कृतची आचार्य

Patil_p

महामारीमुळे 600 पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!