सांखळी प्रतिनिधी
सुरेश बायेकर
कुडणे साखळी येथील शिवप्रेमी संघटणे तर्फे आयोजित शिवकालीन गड-किल्ले पदभ्रमण मोहीमेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी उभारलेल्या व ३६६व्या व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडावर यंदा वर्षी पदभ्रमण करुन शिवकालीन ऐतिहासिक पाऊलखुणा शोधण्याचा तसेच गडावरील तटबंदी,तेहळणी बुरुज,नितल पाण्याच्या तलाव, शिवकालीन १८ विहिरी, शिवकालीन घडीव दगडात बांधलेले भवानी मातेचे मंदिर, गडावरील चौथऱ्यावरील शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा, सर्जा दरवजा, मावळे बुरुज, तुळसाबाई माळवेंची समाधी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी जपुन ठेवलेल्या तलवारी, दांडपट्टा,व इतर युद्धसाहित्य, तसेच गडावरील तोफा यांचे दर्शन व निरीक्षण केले. अशी माहिती संतोष मळीक यांनी तरूण भारत ला दिली