तरुण भारत

प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे बेळगावच्या व्यंकटेश रजपूतची निवड

प्रतिनिधी/ बेळगाव

दिल्ली येथील हम फौंडेशनच्यावतीने दरवषी देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱया 100 प्रभावशाली व्यक्तींची निवड करण्यात येते. यावषी यामध्ये बेळगावच्या व्यंकटेश रजपूतची निवड झाली आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या त्याच्या योगदानाची दखल घेऊन त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Advertisements

हम फौंडेशनतर्फे यावषी कोविडमुळे ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. व्यंकटेशने कोरोनाच्या काळात विविध शिष्यवृत्त्या प्रधानमंत्री साहाय्यता निधीला दिल्या. तसेच यापूर्वी केलेल्या कार्याची दखल हम फौंडेशनने घेतली. छात्र संसदेचे राज्य समन्वयपद, इंडोनेशिया येथे देशाचे प्रतिनिधीत्व व्यंकटेशने केले आहे. यापूर्वी त्याला मंगळूर येथील शामराव फौंडेशनचा स्पेशल अचिव्हमेंट अवॉर्ड, नॅशनल युथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या निवडीने त्याचे कौतुक होत आहे.  

Related Stories

शहरातील व्हॉल्वद्वारे शेकडो लीटर पाणी वाया

Amit Kulkarni

रायगडहून परतलेल्या धारकऱयांचे स्वागत

Patil_p

कुदेमनीत मंगळवारी शुकशुकाट

Amit Kulkarni

कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या नावांची यादी गुप्त ठेवा

Amit Kulkarni

शहराला पाच दिवसाआड पाणी?

Omkar B

हनुमाननगर- जाधवनगर येथील 300 हून अधिक मतदारांची नावे गायब

Amit Kulkarni
error: Content is protected !!