तरुण भारत

खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या ७५ उमेदवारांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंद

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आदेश

प्रतिनिधी/वारणानगर

सन २०१५ च्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीतील खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या पन्हाळा तालुक्यातील १९ गावातील ७५ उमेदवारांना चालू निवडणूक लढवण्यास प्रतिबंद (अनर्ह) करणेबाबतचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला. या आदेशामुळे अशा उमेदवारांना चालू निवडणूक लढवता येणार नाही.

निवडणूक न लढवता येणाऱ्या तालुक्यातील १९ गावातील उमेदवार पुढील प्रमाणे

सातार्डे – आनंदी भरत कांबळे, दत्तात्रय तुकाराम नाईक.
सातवे – प्रविण कष्णात मोरे, भारती सर्जेराव निकम, देवदास वसंत दाभाडे, कोमल काशिलिंग कळंत्रे.
बच्चेसावर्डे – सुभाष सिताराम बच्चे, विश्वनाथ रघुनाथ बच्चे, संतोष मधुकर परिट, गोविंद तातोबा यादव, माधुरी विक्रम कुंभार स्वप्ना गुरुदास घोलप, वसंत विठ्ठल वडिंगेकर, कप्लना शिवाजी मोरे, नंदा चंद्रशेखर घोलप.
आपटी – वनिता नामदेव कदम, उज्वला संपतराव पाटील.
कळे – शामराव कृष्णा कांबळे, रोहिणी सरदार डवंग, वसंत तुकाराम चव्हाण, सुर्यकांत अशोक झुरे, युवराज मधुकर माळवी, लता शिवाजी कुरणे.
केखले – प्रकाश श्रीपती कुंभार, शंकर शामराव गुरव
निवडे – नकुबाई पांडुरंग पाटील, दगडू रामचंद्र चव्हाण, भागुबाई जनार्दन गायकवाड, छाया मानसिंग पाटील, मंगल सर्जेराव पोवार, संदिप यशवंत पाटील, सविता सुभाष कागावळे, आनंदा महिपती कांबळे, उर्मिला संदीप पोवार, सागर बळवंत पाटील, बुधवार पेठ येथील सुधीर दिनकर लोहार, मालुताई बाळहरी कदम, जयश्री शहाजी पोवार,
नावली – सजेराव रंगराव पोवार, राजाराम तुकाराम पाटील, निकमवाडी येथील आबा राम खोत, जयश्री प्रकाश खोत, रामचंद्र यशवंत निकम यांचा समावेश आहे.
आवळी – वंदना जालिंदर पाटील, सुनिता सुभाष लोहार, सुप्रिया सचिन साठे, शहाजी बंडू चौगुले, अजित रंगराव कदम, शांताबाई गंगाराम पाटील, विलास बाबुराव पाटील,
नणुंद्रे – शालाबाई बंडा पाटील, नारायण पांडुरंग यरुडकर, शामराव रामचंद्र पाटील,
कोडोली – अभिजीत बाळासो पाटील, विजय शामराव पाटील, संगिता दावीद दाभाडे, नयन अशोक गायकवाड,
जाफळे – ज्योती गुरुनाथ कांबळे, संगिता मानसिंग पाटील, अल्का काशिनाथ जगदाळे, हौसा नाना मगदूम,
उंड्री – तानाजी बळीराम यादव, शुभांगी विजय मोरे, पंकज शंकर मोरे, छाया आनंदा सुतार, मंगल शहाजी पाटील, राणी भगवान गवळी, रेखा नारायण कांबळे,
वाघवे – संतोष बळवंत कापसे, सिताराम राजाराम घोसाळकर, पैजारवाडी येथील दिपाली दिलीप घोसाळकर, जेऊर म्हाळुगे ठाणे येथील मालुताई पांडुरंग रसाळ यांचा समावेश आहे.

Related Stories

राधानगरी धरण 75 टक्के भरले, 1425 क्युसेकने विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

पर्यावरण आणीबाणी जाहीर करा; मानवी साखळीद्वारे इचलकरंजीत जनजागृती

Abhijeet Shinde

`शिक्षक, पदवीधर’ महाविकास आघाडी एकत्र लढणार : सतेज पाटील

Abhijeet Shinde

जिल्हय़ात सोमवारपासून दस्त नोंदणी सुरू : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राऊतवाडी धबधबा प्रवाहित, मात्र वर्षा पर्यटनासाठी बंदी

Abhijeet Shinde

महामंडळ लुटण्यासाठीच अविश्वास ठरावाची खेळी : मेघराज राजेभोसले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!