तरुण भारत

लव्ह जिहादविरोधी विधेयक मध्यप्रदेश मंत्रिमंडळात मंजूर

भोपाळ / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशनंतर आता मध्यप्रदेशमध्ये देखील लव्ह जिहादविरोधी कडक कायदा बनवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात आले आहे. मध्यप्रदेश मंत्रिमंडळाने शनिवारी धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये अल्पवयीन व दलितांच्या जबरदस्ती धर्मांतराबद्दल शिक्षेची तरतूद आहे. आता सदर विधेयक विधानसभेत मांडले जाणार असून राज्यात भाजपचे बहुमत असल्याने सहज हे विधेयक मंजूर होऊ शकते.

Advertisements

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकामध्ये जबरदस्ती धर्मांतरण केल्याबद्दल 1 ते 5 वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कमीत कमी 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. या कायद्यांतर्गत कोणत्याही अल्पवयीन, महिला, दलित व आदिवासींचे जबरदस्ती धर्मांतर केल्याबद्दल 2 ते 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते व कमीत कमी 50 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. तसेच स्वतःची ओळख लपवून किंवा फसवून विवाह केल्यासही वेगळय़ा शिक्षेची तरतूद आहे.

Related Stories

धक्कादायक : मुलगा झाला या खुशीत वाटले लाडू, पण तो निघाला कोरोनाग्रस्त

prashant_c

एका दिवसात तब्बल 10 हजार रुग्ण बरे

Patil_p

साबरमती रिव्हरप्रंट येथे पतंग महोत्सव

Patil_p

मध्यप्रदेशात 10 मजूर रस्ते अपघातात ठार

Patil_p

हिंसक निदर्शनांमागे देशविरोधी शक्ती!

Patil_p

दिल्ली : बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ जणांचा मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!