तरुण भारत

वाई पोलिसांचा तृप्ती लॉजवर छापा

लॉज मॅनेजरला अटक तर अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

वाई शहरात एका लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. वाई पोलिसांनी काल दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास वाई पोलिसांनी तृप्ती लॉजवर छापा टाकला. तेव्हा लॉजवर चालत असलेल्या गैरप्रकाराचे बिंग फुटले. पोलिसांचा छापा पडल्याची बाब निदर्शनास येताच लॉजमध्ये आणि वाई शहरात खळबळ उडाली होती. काल रात्री उशीरा लॉजच्या व्यवस्थापकास अटक करण्यात आली तर अन्य दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसराज माणिक मान्याळ(वय 43, रा. बोधेवाडी, ता. कोरेगाव) यास अटक केली आहे तर नवनाथ उर्फ पप्या अनिल जाधव(रा. बावधन), जयदीप जयंत खामकर(रा. ब्राम्हणशाही)  अशा तिघांच्यावर वाई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे म्हणाले, वाई शहरात एका लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार पक्की खबर लागल्यानंतर आम्ही तृप्ती लॉजवर छापा टाकण्यासाठी पथक नेमले. एक बनावट ग्राहक बनून पोलीस पाठवले. तेव्हा लॉजचा व्यवस्थापक बसवराज याने लॉजमधील रुम दाखवली. व इतर दोघांनी मुंबईवरुन आणलेल्या दोन युवतीं असल्याचे दाखवले. बनावट ग्राहक बनून गेलेल्यांकडून पाचशे पाचशे रुपये घेताच पोलिसांनी छापा पडल्याचे सांगितले. दुपारी साडे तीन वाजता हा छापा पडल्याचे कळताच वाई शहरात खळबळ उडाली. लॉजमधील इतरांनी पळ काढला तर बसराज मान्याळ यास रात्री पोलिसांनी अटक केली. तर नवनाथ उर्फ पप्या अनिल जाधव व जयदीप जयंत खामकर या दोघांच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956चे कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिर्के यांनी वाइं पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस उपनिरीक्ष मोतेवार तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, विभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पो. कॉ. सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, महिला पोलीस नाईक दीपिका निकम, सोनाली माने यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईबाबत वाई पोलिसांचे अभिनंदन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्प्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.

 मुळापर्यंत पोलीस पोहचणार

मुली पुरवणारा नवनाथ उर्फ पप्या जाधव आणि मालक जयदीप खामकर या दोघांच्यावर जरी गुन्हा दाखल झाला असला तरीही या दोघांना मुंबईहून मुली कोण पुरवत होते. ऐतिहासिक शांत असणाऱया वाईत अनैतिक व्यावसायाला चालणार कशी दिली जात होती. त्या मुलींना वाईमध्ये आणलेच कसे?, याचे मुळ शोधून पोलीस संबंधितांवरही कारवाई करणार असल्याची चर्चा सुरु होती.

त्या दोन युवतींची सुटका

वाई पोलिसांनी छापा टाकल्यानंतर वेश्यागमन करण्यासाठी लॉजवर आणलेल्या दोन युवतीची सुटका करण्यात आली. शासकीय प्रक्रियेनुसार त्यांना आशा किरण वसतीगृहात ठेवण्यात आले आहे.पुढील प्रक्रीया सुरु असून त्यांचे कोणी नातेवाईक असतात त्यांना ताब्यात दिले जाते, असे सांगण्यात आले.

Related Stories

सातारा : दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

Abhijeet Shinde

19 वर्षांखालील दक्षिण विभाग क्रिकेट संघ जाहीर

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 27 हजार 500 कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण

Patil_p

पालिकेच्या वसुली पथकाचे नियोजन कोलमडले

Patil_p

महाराष्ट्र शासनाची नेम प्लेट लावून फिरणार्‍या तोतया क्लार्कला अटक

Abhijeet Shinde

राजीव सातव यांचा उपचारास चांगला प्रतिसाद : माणिकराव ठाकरेंनी ट्वीट करत दिली माहिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!