तरुण भारत

अवैध गुरे वाहतूक करणाऱयांना ग्रामस्थांनी पकडले

नाटेतील घटनेत तिघांविरूध्द गुन्हा दाखल

वार्ताहर  /   जैतापूर                

Advertisements

राजापूर तालुक्यातील नाटे, जैतापूर, आडिवरे परिसरातून मोठय़ा प्रमाणात गुरांची अवैध वाहतूक होत होती. त्याला आळा घालण्यासाठी येथील ग्रामस्थांनी सापळा रचला. गुरूवारी रात्री वेगवेगळे ग्रुप करून ठिकठिकाणी पहारे लावण्यात आले. तब्बल 8 तासांची ‘फिल्डींग’ लावल्यानंतर गुरे वाहतूक करणारे ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. त्यानंतर त्यांना नाटे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा घडलेल्या या चित्तथरारक घटनेची चर्चा राजापुरात जोरदार सुरू आहे. या प्रकरणी नाटे पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

चालक राजेश पाटणकर, सहकारी गुलाब इम्तियाज निशानदार व गुरे देणारा संतोष कुवेसकर अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. गेले अनेक दिवस नाटे, आडिवरे, जैतापूर, गोठणे, धाउलवल्ली या भागात गोतस्कर होत असल्याचे ऐकिवात येत होते. त्यांना पकडून देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठा सापळा रचला. यात समाविष्ठ ग्रामस्थांचे 3 तुकडय़ात वर्गीकरण करून 3 गट 3 दिशेला थांबवण्यात आले. रात्री 11 पासून पहारा देणाऱया गटाने पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत पहारा दिला, पण हाती काहीच लागले नाही. त्यानंतर पहिल्या भागात पुन्हा एक नवीन गट नेमण्यात आला. तासभर वाट पाहिल्यानंतर गयाळ कोकरी भागामध्ये एका गोठय़ात संशयास्पाद हालचाली दिसल्या. तसेच बाहेरून एक बोलेरो काळय़ा रंगाचा प्लास्टिक कागदाने संपूर्ण झाकलेली गाडी सतत त्या ठिकाणी घुटमळताना निदर्शनास आली. पहारा देणाऱया टीममधील लोकांनी हे सगळे प्रकार पाहताच लगेच आपल्या दुसऱया 2 ग्रुपमधील ग्रामस्थांना त्याची माहिती दिली. त्यातील एका गटाने तडक नाटे पोलीस स्टेशनला धाव घेत पोलिसांना माहिती दिली.

दरम्यानच्या काळात गोतस्कर 4 जनावरे गाडीत भरून गाडी भरधाव वेगात बाहेर आणून जैतापूर मार्गाने पुढे निघण्याच्या तयारीत होते. अशातच पहारा देणाऱया ग्रामस्थांनी गाडीसमोर येत गाडी अडवली व मागे काय आहे, असे विचारल्यावर चालक व त्याच्यासोबत असलेल्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन गाडीच्या मागे जाऊन हौद्यात पाहिले असता त्यात डांबून भरलेले 4 बैल गाडीत असल्याचे दिसले. त्याचदरम्यान नाटे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडी चालक व त्याच्या सहकाऱयाला ताब्यात घेतले. त्यानंतर ज्या मालकाने गुरे दिली, त्याच्या घरी पोलिसांनी धडक देत गुरे त्याच्या ताब्यात दिली. तसेच गुरे गोठय़ातून न सोडण्याची ताकीद दिली. 

या प्रकरणी नाटे पोलिसांनी चालक राजेश पाटणकर, सहकारी गुलाब इम्तियाज निशानदार व गुरे देणारा संतोष कुवेसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य संजय बांदकर, मिलिंद शहाणे, सुनील पाध्ये, कपिल रानडे, अनिल पिलके, महेश सातुर्डेकर आदींसह ग्रामस्थांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

करजुवे – मांजरेत वाळू उपसा करण्याच्या तयारीत असलेल्या वाळूमाफियांना दणका

Abhijeet Shinde

सावंतवाडीतील कोविड सेंटर सुरू करा- माजी राज्यमंत्री भोसले यांची मागणी

Ganeshprasad Gogate

राजापूर पंचायत समिती सभापतीपदी प्रमिला कानडे बिनविरोध

Patil_p

जि. प. बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांना पितृशोक

NIKHIL_N

खेड नगर परिषदेत प्रिंटींग पेपरचाही तुटवडा!

Patil_p

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा नवीन १४ रुग्णवाहिका

NIKHIL_N
error: Content is protected !!