तरुण भारत

गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ सोलापुरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन

चूल पेटऊन त्यावर भाकरी थापून दरवाढीचा केला निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये सातत्याने होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज रविवारी सोलापुरातील चार हुतात्मा चौक येथे रस्त्यावर चूल पेटवून त्यावर भाकरी करीत अनोखे आंदोलन करण्यात आले. गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे, धोरण मोदीचे, मरण सर्वसामान्याचे,बहुत हुयी महांगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार, हाय हाय मोदी सरकार हाय हाय, गांधी लढे थे गोरो से हम लढेंगे चोरो से, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी महिला व युवतींनी परिसर दणाणून सोडला होता.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून घरगुती वापराच्या व कमर्शियल गॅसमध्ये सातत्याने सरकार दरवाढ करीत आहे. या सरकारला भारत देशातील गरीब व सर्वसामान्य जनतेची अजिबात आस्था नाही. गेल्या वर्षभरापासून अवघ्या जगाला कोरोनासारख्या महामारी निवड घातलेला आहे. हातावरचे पोट असणाऱ्या व शेतमजूर करणाऱ्या सर्वांचे अधिक कोंडी झालेली आहे. भाजप सरकारने सातत्याने गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. त्यामुळे केंद्रात असलेल्या भाजप सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत अनोखे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती शेवाळे, सोलापूर शहर महिला राष्ट्रवादी आघाडीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सुनिता रोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी तनवीर गुलजार, रुपेश भोसले, मिलिंद गोरे, युवराज माने, सोमनाथ शिंदे, बसवराज कोळी, ज्योतिबा गुंड, निशांत सावळे, पद्मसिंह शिंदे इत्यादींची प्रमुख हजेरी होती. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान तसेच इतर पुरुष पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

Related Stories

मोटार सायकल अपघातात दोन ठार

Abhijeet Shinde

करमाळा येथे हमीभाव खरेदी केंद्रास मंजुरी

Abhijeet Shinde

ग्रामपंचायत प्रशासकाच्या निर्णयाविरोधात सरपंच परिषदेची हाय कोर्टात याचिका

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीत आज पाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये ९ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

सोलापूर : बाल गणेश मंडळ स्थापल्यास पालकांवर गुन्हा दाखल करणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!