तरुण भारत

रामदुर्ग तालुक्यात 1383 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद

वार्ताहर / रामदुर्ग

तालुक्मयातील 33 ग्रा. पं. च्या 491 जागांपैकी कंदापूर ग्रा. पं. च्या 3 जागांसाठी निवडणूक पुढे ढकलल्याने 488 जागांसाठी निवडणुका होऊन 1383 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले. आमदार महादेवप्पा यादवाड यांनी बटकुर्की ग्राम पंचायतच्या वॉर्ड नं. 5 मध्ये मतदान केले. त्याच वॉर्डामध्ये धनलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लण्णा यादवाड व जि. पं. माजी सदस्या रत्ना मल्लण्णा यादवाड यांनी मतदान केले.

Advertisements

तालुक्मयातील कंदापूर ग्राम पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये उमेदवारास दिलेले चिन्ह बॅलेट पत्रामध्ये बदल झाल्याने त्या वॉर्डाचे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. मतदान क्षेत्राजवळील निर्बंधित स्थळी प्रचार करीत असताना एका व्यक्तीस तहसीलदारांनी त्याला धारेवर धरले, तसेच एकाचे मत दुसऱयाने घातल्याने टेंडर मतासाठी संधी दिली, अशा लहानसहान घटना तालुक्मयात आज ग्राम पंचायत निवडणुकीत घडल्या.

तालुक्मयातील कंदापूर ग्राम पंचायतच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये उमेदवारांना दिलेले चिन्ह मतपत्रिकेत बदलल्याने मतदान दि. 29 रोजी पुढे ढलण्यात आले. एकूण 910 मतदार असून तीन जागांसाठी अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाल्यावर 14 जणांनी मतदान केल्यावर चिन्ह बदल झाल्याचे लक्षात आल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. लागलीच नवीन बॅलेट पेपर मुद्रण करीत सकाळी 10 नंतर मतदान सुरू करण्याबद्दल तहसीलदार गिरीश स्वादी यांनी विनंती केली तरी उमेदवार व त्याच्या समर्थकांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करतच राहिले. शेवटी 29 रोजी मतदान करण्याचे ठरले.

गोडची ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये मतदान क्षेत्राच्या निर्बंधित स्थळी प्रचार करत असल्याचे पाहून तहसीलदारांनी नागरिकांना त्याकडे लक्ष न देण्याची सूचना केली. तरीही एकाने तहसीलदारांबरोबर हुज्जत घातल्याने वाद विकोपास गेला. त्यानंतर तहसीलदारांनी त्या व्यक्तीच्या कानफटात लगावल्याने थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, गावामधील ज्ये÷ नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली.

चिलमूर ग्राम पंचायत निवडणुकीत एक वयोवृद्ध महिला मतदानासाठी आली असता दुसऱयानेच तिच्या नावाचे मतदान केल्याचे निदर्शनास आले. यावर आक्षेप घेत ‘चॅलेंज मत’ (टेंडर मत) देण्याचा आग्रह सदर महिलेने धरला असता तिला मतदानाची संधी देण्यात आली.

Related Stories

उपनोंदणी कार्यालय आहे त्या ठिकाणीच हवे

Patil_p

कारभारी दम धरा, नाहीतर फौजदारी गुन्हा …

Amit Kulkarni

प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घ्या

Amit Kulkarni

जमखंडी नगरपालिकेसमोर कर्मचाऱयांचे निदर्शने

Patil_p

व्यावसायिकांकडूनच कचरा टाकण्याचा प्रकार

Amit Kulkarni

मनपा निवडणूक जाहीर ; न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!