तरुण भारत

देशात 20,021 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 20 हजार 021 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 279 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 02 लाख 07 हजार 871 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 901 एवढी आहे.

Advertisements

रविवारी 21,131 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 97 लाख 82 हजार 669 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 77 हजार 301 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशात आतापर्यंत 16 कोटी 88 लाख 18 हजार 054 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 15 हजार 397 कोरोना चाचण्या रविवारी (दि.27) करण्यात आल्या. 

Related Stories

मोठय़ा सुधारणांची संधी : महिंद्रा

Patil_p

तामिळनाडूतील आरक्षणावर सुनावणी होणार

Patil_p

टीव्हीच्या किमती पुन्हा वाढणार?

Patil_p

गुगलविरुद्ध भारतात पुन्हा चौकशीचे आदेश; एकाधिकारशाहिचा आरोप

Sumit Tambekar

पंतप्रधान मोदींची नेपाळ पंतप्रधानांशी चर्चा

Patil_p

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी

datta jadhav
error: Content is protected !!