तरुण भारत

जम्मू-काश्मीर : मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात शांतता भंग करण्यासाठी मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी रविवारी उधळून लावला. याप्रकरणी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील 6 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. पुंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेशकुमार अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

Advertisements

अग्रवाल म्हणाले, पाकिस्तानातील एका म्होरक्याच्या सांगण्यावरून पुंछ जिल्ह्यातील एका मंदिरावर हे दहशतवादी ग्रेनेड हल्ला करणार होते. मेंढर सेक्टरमधील बसूनीजवळ एका वाहनाची तपासणी करताना या कटाची पोलिसांना कुणकुण लागली. त्यानुसार पोलिसांनी 49 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांबरोबर मुस्तफा इक्बाल आणि मुर्तजा इक्बाल या दोन भावांना अटक केली.

चौकशीअंती अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींनी कटाची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, हे दहशतवादी पाकिस्तानशी संबंधित आहेत.

Related Stories

वायुदलाला मिळाली क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा

Amit Kulkarni

उत्तरप्रदेशात शिरले 2 दहशतवादी

Patil_p

कोरोना लसींच्या अनुमतीस विलंब

Patil_p

एफ.आर.पी एकरकमीच मिळणार – वाणिज्य मंत्री गोयल

Abhijeet Shinde

1 कोटी द्या, महागडे विधी करावे लागणार

Patil_p

119 दिवसांत होणार नव्या स्वरुपात विश्वनाथाचे दर्शन

Patil_p
error: Content is protected !!