तरुण भारत

गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका

प्रतिनिधी/ फेंडा

गोवा डेअरीची परिस्थिती सुधारावी यासाठी सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती डेअरीचा कारभार हाताळण्यास सपशेल अपयशी ठरलेली आहे. आमसभा पुढे ढकलण्यामागील कारण सर्व शेतकऱयांना अचंबित करणारे आहे. सहकार खात्याचे सक्षम कर्मचारी समितीत समाविष्ट असतानाही कागदोपत्री घोळ कसा होतोय? डेअरीवर नुकसानीचा बोजा वाढतच असून दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका डेअरीची खरी आर्थिक परिस्थिती दुध उत्पादाकांना आमसभेतून द्या अशी मागणी  अनूप देसाई यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेतून केली.

Advertisements

यावेळी दुध उत्पादक प्रमोद सिद्धये, वैभव परब, संजीव कुकळय़ेकर उपस्थित होते. डेअरीने सादर पेलेल्या अहवालानुसार सुमारे 8 कोटी नुकसानीत आहे. तरीही अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर डेअरीतील खर्च कपात करून फायद्यात असल्याचे सांगून दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवले आहे. या मुद्दावर त्रिसदस्यीय समितीने स्पष्ट  भूमिका घ्यावी. काल रविवारी होणारी आमसभा कोणतेही ठोस कारण नसताना का पुढे ढकलली, डेअरीच्या कोणत्या कायद्यात अशी तरतूद आहे ते समितीने स्पष्ट करावे. आमसभा पुढे ढकलण्यामागे कोणते कारण आहे. येत्या 11 जानेवारी रोजी डेअरीच्या त्रिसदस्यीय समिती नेमणूकीवरून आव्हान याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीचा निकाल दुध उत्पादकांच्या बाजूने लागल्यास 17 जाने. रोजी होणाऱया आमसभेपासून समितीला हात झटकून मोकळे होता येईल हा डाव असल्याचा दावा अनूप देसाई यांनी केला.

घोटाळेखोराविरोधात सावध भूमिका

 जेव्हापासून डेअरीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे तेव्हापासून डेअरीला नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचा दावा केला असून डेअरी संचालक मंडळाच्या कार्यकाळात नफ्यात असल्याचा उजाळा दिला. मात्र संचालक मंडळाच्या कार्यकाळातील घाटाळेखोरविरोधात कारवाईसाठी जोरदार मागणी करीत नसून मवाळ भूमिका घेतात. डेअरी आर्थिक स्थिती सुधारण्याची एकमेव संधी असलेला सहाय्यक निबंधक राजेश परवार यांनी घोटाळेखारे संचालकाविरोधात सादर केलेला चौकशी अहवाल धूळ खात आहेत. त्य़ावर कार्यवाही करून संचालक व त्यात गुंतलेल्या भ्रष्ट डेअरी कर्मचाऱयावर कारवाईकडे कोणताच दुध उत्पादका मागणी का करत नाही असे विचारल्यावर सारवासारव करण्यापलीकडे कोणत्याच हालचाली होत नाहीत. जर ही रक्कम घोटाळेखोराकडून वसुल करून घेतल्यास डेअरी तात्काळ नफ्यात येणार असल्याचे काही दुध उत्पादकांचे म्हणणे आहे.

गोवा डेअरीची दुध विक्री दिवसेंदिवस घट होत असून डेअरीची विश्वासहर्ता ग्राहकांनी गमावू नये यासाठी आमसभेतून ठोस पावले उचलण्यात यावी अशी मागणी दुध उत्पादाकांनी केली आहे.  

Related Stories

वादग्रस्त प्रश्नप्रकरणी चार शिक्षकांना नोटीस

Omkar B

ऐन उकाडय़ात इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बंद

Patil_p

मोले चेक नाक्यावर दारुसाठा जप्त

Amit Kulkarni

म्हापशाच्या चौफेर विकासासाठी सातव्यांदा निवडून देतील- सुधीर कांदोळकर

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांना चक्रीवादळाचा फटका

Omkar B

प्रमोद सावंत यांनी लोकांची फसवणूक करु नये

Omkar B
error: Content is protected !!