तरुण भारत

रत्नागिरीच्या शिक्षिका वाघेला ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये चमकणार!

प्रतिनिधी/ रत्नागिरी

देशपातळीवरील बिग शो, ज्यात द बीग-बी अर्थात हिंदी सिनेसृष्टीतील शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसायचे भाग्य मिळणारा कार्यक्रम सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये जाण्याचे स्वप्न अनेकजण उराशी बाळगतात. हे स्वप्न रत्नागिरी शहरानजीकच्या बंदररोड येथील रहिवासी व नगर परिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या भावना प्रवीण मोटघरे-वाघेला यांचे पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना झाला आहे. केबीसीमध्ये निवड होणाऱया बहुदा जिल्हय़ातील त्या पहिल्या महिला आहेत.

Advertisements

  केबीसीमध्ये निवड होण्याची प्रक्रियाही तितकीच जटील आहे. देशभरातून करोडो लोक प्राथमिक टप्प्यात प्रश्नांची उत्तरे देत जातात आणि त्यानंतर मुलाखतीपर्यंत अनेक टप्प्यापर्यंत पोहोचतात. त्यानंतरही परत निवड झाल्याचा कॉल येणे हे जवळजवळ भाग्याचेच. निवड झाल्यानंतरही हॉटसीटवर बसण्यासाठी सर्वात वेगवान उत्तर देणे गरजेचे असते. इतके सारे टप्पे पार करून हॉटसीटवर बसणे नक्कीच भाग्याचे म्हणावे लागेल. हे भाग्य रत्नागिरीच्या भावना मोटघरे यांना लाभले आहे.

   केबीसीतून निवड झाल्याचा दूरध्वनी आला अन्..

 या शोमध्ये सामान्यज्ञानाची आवश्यकता आहे. भावना यांनी यासाठी खूप तयारी केली. त्यानंतर एक-एक टप्पे पार केल्यानंतर त्यांना अखेरीस केबीसीमध्ये निवड झाल्याचा दूरध्वनी आला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या भागाचे चित्रिकरण 8, 9, 10, 11 डिसेंबरला गोरेगाव फिल्मसिटी येथे झाले. केबीसीमध्ये निवड होणे, ही गोष्ट ‘लाईफटाईम अचिव्हमेंट इन माय लाईफ’ अशा शब्दांत भावना मोटघरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून त्यांच्याशी बोलण्याचा अनुभव व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, प्रत्यक्ष बीग-बींसमोर बसणे, हा माझ्यासाठी चमत्कारिक आणि उत्कंठाचा असा अनुभव आहे.

  ‘फास्टर फिंगर फर्स्ट’मधून ठरल्या विजेत्या

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर त्या विराजमान होऊन रत्नागिरीची मान उंचावणार आहेत. शिक्षिका भावना मोटघरे- वाघेला या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमासाठी पात्र ठरल्या होत्या. या कार्यक्रमात हॉटसीटवर बसण्यासाठी घेण्यात येणाऱया ‘फास्टर फिंगर फर्स्ट’ यातून त्या विजेत्या होऊन आता महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर पाहण्याची सुवर्णसंधी येत्या 30 व 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9 ते 10.30 वाजता सोनी टीव्हीवरील एपिसोडमध्ये मिळणार आहे.

Related Stories

पाठलाग करून दीड लाखाची गोवा दारू जप्त

NIKHIL_N

तब्बल 20 वर्षांनी मैदानातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी!

Patil_p

रत्नागिरी : मिरकरवाडा परिसराला वादळी पावसाचा तडाखा

Abhijeet Shinde

मुख्यालयी राहण्याचा आदेश अन्यायकारक!

NIKHIL_N

मधमाशांच्या हल्ल्यात नेपाळी कामगाराचा मृत्यू

NIKHIL_N

जिल्हय़ात ‘लॉकडाऊन’मध्ये मोठी शिथिलता

NIKHIL_N
error: Content is protected !!