तरुण भारत

पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा ते मेढा रस्त्यावर आकले, ता. सातारा गावच्या हद्दीत जलसागर ढाब्यानजिक पिकअपने दिलेल्या धडकेत टेकवली, ता. महाबळेश्वर येथील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर साताऱयातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून हा अपघात दि. 23 रोजी सायंकाळी घडला आहे. त्याबाबतची तक्रार दि. 26 रोजी दाखल झाली आहे. याप्रकरणी पिकअप चालक महेश शामराव गायकवाड (रा. मोरघर, ता. जावली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार वैभव शिवराम केळगणे वय 26 रा. टेकवली, ता. महाबळेश्वर हा त्याचा चुलत भाऊ आकाश अशोक केळगणे याच्यासमवेत दुचाकी (क्रमांक एम. एच. 11 बीई 1320) RRया दुचाकीवरुन साताऱयाहून काम उरकून महाबळेश्वरकडे निघाला होता. दि. 23 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास मेढा बाजुकडून येणारी पिकअप गाडी (क्रमांक एम. एच. 11 बीएल 1265) या वाहनाने दुचाकीला समोरुन धडक दिली.

या अपघातात आकाश अशोक केळगणे गंभीर जखमी झाला. तर तक्रार वैभव केळगणे किरकोळ जखमी झाला आहे. आकाशवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु असून वैभव केळगणेच्या तक्रारीनंतर पिकअप चालक महेश गायकवाडवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक महांगडे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Related Stories

सांगलीत कोरोनाचा १२ वा बळी,नवे १३ रुग्ण

Abhijeet Shinde

दहीहंडी साजरी करणारच: संदीप देशपांडे

Abhijeet Shinde

वाधवान बंधूंच्या बंगल्याची झाडाझडती

Patil_p

मुंब्रा येथील प्राइम रुग्णालयाला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू

Rohan_P

पाटील-पवार शाही विवाह सोहळय़ाला मान्यवरांची उपस्थिती

Amit Kulkarni

तिसंगीत रानभाजी महोत्सवाचे उदघाटन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!