तरुण भारत

चोरीस गेलेला १६ लाखांचा बकरा कराडात सापडला


आटपाडी येथील तीन संशयित ताब्यात

प्रतिनिधी / कराड

Advertisements

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील १६ लाखांचा बकरा दोन दिवसांपुर्वी चोरीस गेला होता. चोरीस गेलेला हा बकरा शोधण्यात आटपाडी पोलिसांना यश आले असून कराड येथे बकरा सापडला आहे. दरम्यान याप्रकरणी आटपाडीच्या तिघांना कराड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या १६ लाखाचा बोकड चर्चेचा विषय ठरला होता. त्याला आटपाडीच्या बाजारात ७० लाख रुपये इतक्या प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. मात्र, त्यातील १६ लाखांचा बोकड आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला. हाच बोकड चोरी गेला होता. शनिवारी पहाटे चोरांनी गोठ्यात शिरुन त्याला पळवलं होते. विशेष म्हणजे एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बोकड लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली होती.

आटपाडी पोलिसांनी बकरा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. हा बकरा घेऊन तीन संशयित कराड परिसरात आल्याची माहिती आटपाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कराड येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा बकरा हस्तगत करण्यात आला आहे.

Related Stories

सांगली: महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

Abhijeet Shinde

सातारा : लिंबाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

datta jadhav

दहशतवाद विरोधी पथकांची कारवाई

Patil_p

सातारा जिल्ह्यात आणखीन ३६ जण पॉझिटिव्ह तर १९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा यवतेश्वर कास रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य

Abhijeet Shinde

बॉम्बे रेस्टारंट पुलाखाली दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

datta jadhav
error: Content is protected !!