तरुण भारत

राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती पारधी यांचा राजीनामा

प्रतिनिधी / सांगली

मागासवर्गीय समाजाची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित हारगे हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती पारधी यांनी राजीनामस्त्र उगारले आहे. गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. हारगे फोन वरून जातीवाचक तसेच अर्वाच्च शिवीगाळ करतात. प्रभागात फिरायचे नाही अशी धमकी देतात असे गंभीर आरोपही पारधी यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात केले आहेत.

पारधी या प्रभाग २० मधून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे हारगे यांच्या पत्नी संगीता हारगे ही याच प्रभागातून निवडून आल्या आहेत. पारधी यांच्या राजीनामा अस्त्राने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. दरम्यान राष्ट्रवाडीचेच नगरसेवक योगेंद्र थोरात यांनीही अभिजित हारगे यांच्यावर आरोप केले आहेत. हारगे नळ कनेक्शन जोडणीचे काम हारगे यांनी बंद पाडले आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकारणी कारवाई करा अशी मागणी थोरात यांनी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : कृष्णाकाठावर पाण्याची पातळी स्थिर

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात नवे 299 तर 795 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सांगली : वाळवा तालुक्यात कोरोनाचा मृत्यूदर धडकी भरवणारा!

Abhijeet Shinde

सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या,घात-पाताचा संशय

Abhijeet Shinde

सांगली : समडोळीत स्वाभिमानी कोरोना केंद्राचे आज उद्घाटन

Abhijeet Shinde

विजेच्या तारेत अडकून कृषी सहाय्यक जागीच ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!