तरुण भारत

शादी किसी की हो

एका जुन्या गाण्यातली ओळ आहे, ‘शादी किसी की हो, अपना दिल गाता है’.  लग्न हा आनंदाचा सोहळा असतो. जुनी दोन तीन दिवस चालणारी परगावची लग्ने मी पाहिली आहेत. आदल्या दिवशीचं सीमांत पूजन. रात्रीचं ते जरा साधं जेवण लग्नाच्या वातावरणात खूप रुचकर लागतं. जेवण उरकलं की रात्रीच्या मुक्कामासाठी ठेवलेल्या खोल्यांमधली चांगली खोली चपळाईने पटकवणे हा महत्त्वाचा कार्यक्रम असे. तो पार पडला की खोलीला कुलूप लावून मुख्य हॉलमध्ये गप्पाष्टके, जागरण, कॉफीचे प्याले, आपला पक्ष वधूपक्ष असेल तर रुखवत मांडण्याची आणि इतर तयारी. पहाटे झोप लागते आणि सकाळी डोळे चोळत अनिच्छेने उठावे लागते. मग आंघोळी उरकून झोप उडवली की कार्यालयातल्या चहाला गोळी मारून चौकात फिरायला जाणे, काहीतरी चमचमीत खादाडी करणे आणि घाईघाईने कार्यालयात परतणे.

 लग्नांचे खर्च आटोपशीर झाल्याने हे सगळे दुर्मिळ होऊ लागले आहे. पूर्वी मांडवात पांढऱया शुभ्र भारतीय बैठकी घातलेल्या असत. जेवणं झाली की पाहुणे हातपाय पसरून प्रशस्त फतकल मारीत. पानसुपारीचे डबे फिरवले जात. एखादा तक्क्या घेऊन तिथं लवंडायचा मोह क्वचितच आवरला जाई. अशा ठिकाणी पहुडल्या पहुडल्या मी थोरांच्या तोंडून राजकारणाच्या गप्पा, सोयरिकी जुळवण्याचे मनसुबे, कौटुंबिक उखाळय़ापाखाळय़ा मनसोक्त ऐकल्या आहेत.  सुटसुटीत सोहळय़ात पार पडणाऱया लग्नाला गेलं की ते दिवस आठवतात. क्षणभर वाईट वाटते. आता भारतीय बैठका नसतात. रंगीत कापड लावलेल्या किंवा साध्या खुर्च्या असतात. गप्पा रंगत नाहीत. लोक आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपात किंवा सेल्फीत गर्क असतात. पण सुटसुटीत लग्नाचा एक फायदा असतो. पाहुणे कमी असतात. त्यामुळे त्यात गट पडत नाहीत. सगळे जवळचे असतात. एकमेकांना ओळखत असतात. परवा एका लग्नात गेलो. कोरोनाच्या अवकृपेमुळे पन्नासच लोक होते. पण सगळे अगदी जवळचे. त्यामुळे गप्पा रंगल्या. कार्यालयात रेंज नसल्यामुळे व्हॉट्सअप विकलांग झाले होते. आपोआपच सगळेजण एकमेकांशी कौटुंबिक सुखदु:खावर बोलत राहिले. त्यातच साहित्यप्रेमी पुतणी भेटली आणि वेगळय़ा गप्पांमुळे दुधात साखर पडली. मंगलाष्टके झाली. मर्यादित पाहुणे असल्याने जेवणे अगदी झटकन उरकली. गंमत म्हणून मास्क लावूनदेखील सेल्फी काढल्या. एक मजेदार कल्पना मनाच्या पृ÷भागावर आली. पूर्वी सिनेनियतकालिकात नटनटय़ांच्या कपाळ आणि डोळय़ांचे फोटो छापून येत. त्यावरून व्यक्ती ओळखली की स्पर्धकाला बक्षीस मिळे. मास्क लावून काढलेल्या थोरांच्या फोटोंबाबत अशी स्पर्धा घ्यायला हवी!

Advertisements

Related Stories

टेलिफोन हेरगिरीः सर्वोच्य न्यायालयाचा दणका

Patil_p

मुक्तपुरुष स्वतःच एक चालतंबोलतं तीर्थक्षेत्र असतो

Patil_p

ऑनलाईन व्यसन : समस्या व उपाय

Patil_p

पुलकित नाग्या

Patil_p

खासगी विना अनुदानित शाळा संस्था संकटात

Patil_p

शिंझो आबे पायउतार झाले खरे..!

Patil_p
error: Content is protected !!