तरुण भारत

अलोन स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

प्रतिनिधी/ बेळगाव

दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी चषक लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अलोन स्पोर्ट्स संघाने सहारा स्पोर्ट्स संघाचा 2 गडय़ांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऋषिकेश पाटीलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात बेळगाव ब्ल्यू संघाने बेळगाव रेड संघाचा तीन गडय़ांनी पराभव केला. स्वाती भाटेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisements

युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात सहारा स्पोर्ट्सने 24.5 षटकात सर्व बाद 87 धावा केल्या. माधव धारवाडकरने 43, साई कारेकरने 14 तर गौरव कांटेने 11 धावा केल्या. अलोन स्पोर्ट्तर्फे ऋषिकेश पाटीलने 11 धावात 2, ओमकार देशपांडेने 16 धावात 2, मनिष व सिद्धार्थ हुल्लोळी यांनी प्रत्येकी 18 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अलोन स्पोर्ट्सने 21.3 षटकात 8 गडी बाद 90 धावा जमवित दोन गडय़ांनी विजय मिळविला. कामील बाँम्बेवालेने 26, उत्कर्ष शिंदे व मयुरेश शिरोडकर यांनी प्रत्येकी 12 तर आदित्य हिरेमठने 10 धावा केल्या. सहारातर्फे पृथ्वीराज कम्मारने 13 धावात 3, राजेंद्र दगण्णावरने 11 धावात 2, झुबेर सावनूरने 29 धावात 2, तर मनोज सुतारने 14 धावात 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आर. एम. चौगुले, किरण पाटील, अफनान गंगवालजी, गुरूनाथ अष्टेकर यांच्या हस्ते अलोन स्पोर्ट्सच्या ऋषिकेश पाटील याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मुलींच्या प्रदर्शनीय सामन्यात बेळगाव ब्ल्यू विजयी

महिला क्रिकेटच्या प्रसारासाठी जिमखानामध्ये सोमवारी मुलींचा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. बेळगाव रेड, बेळगाव ब्ल्यू या संघांत हा सामना खेळविण्यात आला. या सामन्यात बेळगाव ब्ल्यू संघाने रेड संघाचा 3 गडय़ांनी पराभव केला. रेड संघाने 20 षटकात 4 बाद 112 धावा केल्या. स्वाती भाटेने 4 चौकारासह नाबाद 33, चिन्मया बुकीटगारने 2 चौकारासह 21 तर समृद्धी जाधवने 11 धावा केल्या. बेळगाव ब्ल्यूतर्फे अक्सा नदाफ, पद्मश्री साबण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव ब्ल्यू संघाने 20 षटकात 7 बाद 117 धावा जमवित 3 गडय़ानी विजय मिळविला. गुंजन निलजकरने नाबाद 12, नीता तुक्कारने 11 तर प्रतीक्षा गुणकर व झोया काझी यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. बेळगाव रेडतर्फे स्वाती भाटेने 13 धावात 3 तर चिन्मया बुकीटगार, भक्ती हुद्दार, समृद्धी जाधव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विक्रम देसाई, नागेश देसाई, परशराम पाटील, विठ्ठल गवस, जयसिंह राजपूत, नासीर सनदी यांच्या हस्ते स्वाती भाटेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

मंगळवारचे उपांत्य सामने : 1) एक्सेस इलाईट हुबळी वि. साईराज हुबळी टायगर्स, स. 9.30 वा., 2) अलोन स्पोर्ट्स बेळगाव वि. सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स दु. 1.30 वा.

Related Stories

बेळगाव जिह्यात मंगळवारी ४०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Rohan_P

कुली कामगारांना सोडले त्यांच्या गावी

Patil_p

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे मेटगूड हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni

तालुक्मयाच्या पश्चिम भागात बटाटे लागवडीस प्रारंभ

Patil_p

मतिमंद महिलेला मिळाला आसरा

Amit Kulkarni

किरण ठाकुर-सहकार क्षेत्रातील राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्व

Amit Kulkarni
error: Content is protected !!