तरुण भारत

स्वयंचलित मेट्रो सेवेचा दिल्लीत शुभारंभ

पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा : 2025 पर्यंत 25 पेक्षा अधिक शहरात मेट्रो धावणार असल्याची घोषणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालकविरहित मेट्रो रेल्वे राजधानी दिल्लीत सोमवारपासून सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा कंदील दाखवला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांमुळेच दिल्लीला पहिली मेट्रो मिळाली. आम्ही सत्तेत आलो तेव्हा केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो सेवा होती. आता 18 शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. तर 2025 पर्यंत 25 पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. चालकविरहित स्वयंचलित मेट्रोच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

दिल्लीत पहिल्या टप्प्यात मजेंटा लाईनच्या जनकपुरी पश्चिम ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन स्थानकादरम्यान चालकविरहित मेट्रो गाडय़ा धावणार आहेत. या मार्गावर ही सेवा पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर त्याचा विस्तार केला जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी मजेंटा लाईनवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर आता याच मार्गावर चालकविरहित मेट्रो सेवा सुरू झाली आहे.

2025 पर्यंत देशातील 25 पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सुरू होणार आहे. तसेच देशात होत असलेल्या अशा बदलांमुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होतो. आधी मेट्रो सेवेबद्दल कोणतेही स्पष्ट धोरण नव्हते. मात्र आम्ही मेट्रो सेवेवर वेगाने काम केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भविष्यातील गरजांचा विचार करून देश पुढे जात आहे. शहरीकरणाला आव्हान मानून आपण त्याचे रुपांतर संधीत करायला हवे, असे मत मोदींनी व्यक्त केले आहे.

‘मेक इन इंडिया’ला बळकटी

देशात सन 2014 मध्ये केवळ 248 कि.मी. इतक्मया अंतरावर मेट्रो लाईन सुरू होत्या. आज तीनपट जास्त म्हणजेच 700 कि.मी. अंतरावर मेट्रो धावत आहेत. सन 2025 पर्यंत आम्ही त्या 1,700 कि.मी. पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले. मेट्रोचा विस्तार करताना ‘मेक इन इंडिया’ मोहीम महत्त्वाची भूमिका बजावत असून यामुळे प्रकल्पांचा खर्च कमी झाला असून विदेशी चलनाचीही बचत झाली आहे. तसेच देशातील नागरिकांना अधिक रोजगारही उपलब्ध झाल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

मोबिलिटी कार्डचेही उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते याप्रसंगी कॉमन मोबिलिटी कार्डचेही उद्घाटन करण्यात आले. देशाच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल असून तुम्ही कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, यासाठी हे एकच कार्ड तुम्हाला उपयोगी पडेल, असे मोदी यावेळी म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आधुनिक मेट्रो सेवा उपलब्ध झाल्याबद्दल अभिनंदन केले.

Related Stories

बेंगळूरमध्ये कोरोनाबाधितावर प्रथमच प्लाझ्मा थेरपी

Patil_p

देशात आणखी 15 हजार बाधित

datta jadhav

मोठय़ा सुधारणांची संधी : महिंद्रा

Patil_p

देशाची मान झुकू देणार नाही!

Patil_p

दिल्ली : थिएटर्समध्ये सफाई आणि सॅनिटायझेशनचे काम सुरू

Rohan_P

नातीनं आजीचं नाक कापलं : परेश रावल

Rohan_P
error: Content is protected !!