तरुण भारत

सांगली : राष्ट्रवादी महिलांचे गॅस दरवाढीविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन

प्रतिनिधी / सांगली

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर भाववाढ केल्याने सामान्य गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. ह्या भाववाढीमुळे गोरगरिबांवर अन्याय होत असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहर जिल्हा यांच्यावतीने आज रस्त्यावर चुल मांडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी गॅस दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला कात्री लावणाऱ्या केन्द्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी महिला आघाडी शहर जिल्हा अध्यक्षा विनया पाठक यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्योती आदाटे, डाँ. छाया जाधव, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, आशा पाटील, जसबीर कौर खंगुरा, जयश्री भोसले, प्रियांका तुपलोंडे, सुनिता लालवानी, जयश्री चौगुले,संध्या आवळे, संगीता मासाळ, अर्चना भोई, सुरेखा मासाळ, संगीता मोठे, वैशाली कांबळे व इतर महिला उपस्थित होत्या.

Advertisements

Related Stories

सांगली : चिंचणी पोलीस ठाण्यास आयएसओ ए प्लस मानांकन

Abhijeet Shinde

घोरपडीची शिकार करुन मांस खाल्ले, कडेपूरच्या बाप-लेकाला अटक

Abhijeet Shinde

सांगलीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

Abhijeet Shinde

प्रकल्प ग्रस्तांच्या नोकरीतील आरक्षण वाढवू – मंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली : केवळ घोषणा : मदत नाहीच

Abhijeet Shinde

सांगली शिवसेना कार्यालयात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!