तरुण भारत

राज्यात आज दत्तजयंती उत्सव

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात आज सर्वत्र दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येईल. मुख्य समारंभ गोव्याची नरसोबावाडी म्हणून ओळखल्या जाणाऱया सांखळी येथील श्री दत्तमंदिरात होणार आहे. त्याचबरोबर म्हापसा दत्तवाडी येथील दत्त देवस्थान, कुंडई येथील पद्मनाभ संप्रदायातर्फे दत्तजयंती तसेच केपे येथील दत्त मंदिर, सावईवेरे येथे दत्तमंदिर तसेच ताळगाव येथील दत्तमंदिरात देखील विशेष कार्यक्रम होतील. कोरोना महामारीमुळे यंदाच्या उत्सवावर बरेच नियंत्रण आले असून हा उत्सव यंदा सर्वच देवस्थानांनी अत्यंत मर्यादित स्वरुपात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या उत्सव काळात दुकाने वगैरे असणार नाहीत. शिवाय मंदिरात प्रवेश देखील मर्यादित काळात ठेवण्यात आलेला आहे. सायंकाळी 5 वा. दत्तजन्म सोहळा आयोजित केला जातो तो देखील यावर्षी सार्वजनिक स्वरुपात होणार नसल्याचे वृत्त आहे.

Advertisements

Related Stories

सांगे, केपे, सासष्टी व मुरगाव तालुक्यांना 19 व 20 रोजी मर्यादित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

‘लोकमान्य’ च्या गणरंग चित्रकला स्पर्धेचा बक्षिसवितरण समारंभ

Patil_p

‘ऑक्सिजन’ संदर्भात गोवा स्वयंपूर्ण

Omkar B

आमदार पात्रता निवाडय़ावर 22 रोजी अंतिम युक्तिवाद

Amit Kulkarni

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट दाखल

Amit Kulkarni

वादळग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करु

Amit Kulkarni
error: Content is protected !!