तरुण भारत

पद्मजा पोळ हिच्या चित्रकृतीच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रतिनिधी / शिरोळ

कै. ए. आर. पोळ सर यांच्या चित्रकलेमध्ये हातखंडा होता. त्यांचीच कला त्यांची नात कुमारी पद्मजा सुनील पोळ हीने जोपासली आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्थळावर स्तरावर आपल्या गावचे आपले नाव मिळवावे त्यास लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली. येथील राजश्री वाचन मंदिरात कुमारी पद्मजा सुनील पोळीच्या चित्रकला भव्य प्रदर्शनचे उद्घाटन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे होते.

Advertisements

पद्मजा पोळ ही बॅचलर ऑफ फार्मसीमधील अंतिम वर्षात सांगलीच्या बिरनाळे कॉलेजमध्ये अध्ययन करीत असून लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत अभ्यासाबरोबरच वेगवेगळी पेंटिंग करण्यासाठी केला. जवळपास 100 वेगवेगळे पेंटिंग तिने साकारलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे उच्च कलेचे कोणतेही शिक्षण तिने घेतलेली नाही. तरीसुद्धा उत्कृष्टरितीने पेंटिंग तयार केलेली आहेत. तिने तयार केलेल्या आकर्षक चित्रकलेचे प्रदर्शन हिरोचे ऐतिहासिक राजश्री छत्रपती शाहूनगर वाचन मंदिरात मंगळवार बुधवार दोन दिवस (मंगळवार, बुधवार) भरविण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव माने, देशमुख कार्यवाहक धनाजीराव जाधव, एम एस माने, बजरंग काळे, रावसाहेब देसाई, संजय शिंदे, गजानन संकपाळ, विजय आरगे, संजय पाटील, पिंटू गावडे, बंडू गावडे यांच्यासह वाचनालयाचे सर्व संचालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ातील पहिला पॉझिटिव्ह कोरोनामुक्त !

Abhijeet Shinde

नवखे बॅनरबाजीत, अनुभवी जोडणीत

Abhijeet Shinde

आगामी निवडणुकांसाठी ताकदीने कामाला लागा – सोनल पटेल

Sumit Tambekar

कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा चर्चेत!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सर्पदंश झालेल्या बालकाचा उपचारा अभावी मृत्यु

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गॅस पाईपलाईन योजनेला महापालिकेचा हिरवा कंदील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!