तरुण भारत

ता.पं.कार्यकारी अधिकाऱयांकडून शौचालयांची पाहणी

अनेकांना केल्या सूचना : विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज शौचालये उभे करण्याचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव तालुक्मयातील प्राथमिक, माध्यमिक आणि अंगणवाडीसाठी शौचालयांची निर्मिती करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने बेळगाव तालुक्मयातील अनेक ठिकाणी याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची पाहणी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केली असून संबंधितांना सूचनाही केल्या आहेत.

बेळगाव तालुक्मयात आता मोठय़ा प्रमाणात शौचालयांची निर्मिती शाळांमध्ये करण्यासाठी धडपड करण्यात आली आहे. त्यामुळे या शौचालय व स्वच्छतागृहांची कामे व्यवस्थित झाली आहेत की नाही? याकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी कलादगी यांनी पाहणीदौरा केला. यावेळी काही ठिकाणी अडचणी होत्या. त्या सोडवून विद्यार्थ्यांसाठी योग्य पद्धतीने शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी शौचालयांची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे तातडीने ती कामे पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. काही पीडीओंना धारेवर धरत तातडीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. तालुक्मयातील भेंडीगेरी, अरळीकट्टी, हिरेबागेवाडी, तारिहाळ, चंदनहोसूर, मास्तमर्डी, के. के. कोप्प आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी विविध समस्या निवारण्यासाठी प्रयत्न करून शौचालयांचे बांधकाम योग्य प्रकारे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

गौरीचे आज होणार आगमन

Patil_p

कोरोनाकाळात घरोघरी जाऊन शेतीचा फाळा केला वसूल!

Amit Kulkarni

देवाचिये द्वारी आता प्रशासक कारभारी!

Amit Kulkarni

मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढला

Amit Kulkarni

बाची-शिनोळी फाटय़ावर ऊस भरलेली ट्रक्टर ट्रॉली उलटली

Amit Kulkarni

टेम्पो-दुचाकी अपघातात भिवशीचा तरुण ठार

Patil_p
error: Content is protected !!