तरुण भारत

प्रचंड यांनी मागितली भारत, अमेरिकेकडून मदत

वृत्तसंस्था/ कोलकाता

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांनी आता भारत, अमेरिका आणि युरोपकडून मदत मागितली आहे. प्रचंड यांनी नेपाळच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, सभापतींसह कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व दिग्गज नेत्यांची भेट घेतली, परंतु आता पक्षातील फूट रोखण्यापासून त्यांना आत कुठलाच मार्ग सूचत नसल्याचे चित्र आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या विदेश विभागाचे उपमंत्री गूओ येझोउ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला भेटल्यावर प्रचंड यांनी भूमिका मांडली आहे. भारत नेहमीच नेपाळमधील लोकशाहीवादी आंदोलनांचे समर्थन करत आला आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडून ससंद विसर्जित करत लोकशाहीची हत्या करण्यात आल्यावरही भारताचे मौन समजण्यापलिकडील असल्याचे उद्गार प्रचंड यांनी काढले आहेत.

Advertisements

लोकशाहीवादी भारत, अमेरिका तसेच युरोपच्या देशांचे मौन आश्चर्यजनक आहे. लोकशाहीचा खरा समर्थक असल्यास भारताने ओली यांच्या निर्णयाला विरोध दर्शवावा असे प्रचंड म्हणाले.

Related Stories

कोरोना नष्ट करणाऱया अँटीबॉडीचा शोध

Patil_p

चीनची धोकादायक चाल

Patil_p

भारताशी संबंध आणखी दृढ करणार

Omkar B

पाकचाही चीनला दणका; ‘टिकटॉक’वर घातली बंदी

datta jadhav

मालदीव 15 जुलैपासून पर्यटकांसाठी खुले

datta jadhav

डेन्मार्कमध्ये मिळाली 3000 वर्षे जुनी कांस्य तलवार

Amit Kulkarni
error: Content is protected !!