तरुण भारत

महिलांना अधिकार मिळवून देणाऱया लुजैनला कारावास

सौदी अरेबियातील प्रकार : देशाच्या सुरक्षेला धोक्यात आणल्याचा आरोप

वृत्तसंस्था / रियाध

Advertisements

सौदी अरेबियाच्या एका न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या लुजैन अल हथलौल यांना 5 वर्षे 8 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. लुजैन दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. देशातील राजकीय व्यवस्था बदलू पाहत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. देशाच्या सुरक्षेसाठीही त्यांना धोकादायक ठरविण्यात आले आहे. लुजैन यांनी देशातील महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोहीम राबविली होती. युवराज मोहम्मद बिन सलमान याला उदारमतवादी मागणी ठरवून महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार प्रदान केला होता.

लुजैन (वय 31) यांना शिक्षा ठोठावताना न्यायालयाने त्यांना एक दिलासाही दिला आहे. 15 मे 2018 पासून त्या तुरुंगात आहेत, तर त्यांची दोन वर्षे 10 महिन्यांची शिक्षा स्थगित ठेवण्यात आली आहे. याचमुळे त्या मार्च महिन्यात तुरुंगातून बाहेर पडू शकतात. परंतु मुक्ततेसोबत दोन अटीही असणार आहेत. 5 वर्षांपर्यंत अन्य कुठल्याच देशाचा दौरा करता येणार नाही. तसेच कुठल्याही निदर्शने तसेच मोहिमांमध्ये त्यांना भाग घेता येणार नाही.

लुजैन दहशतवादी नाही

माझी बहिण कार्यकर्ता आहे, दहशतवादी नाही, तिला शिक्षा ठोठावणे चुकीचे आहे. आम्ही या निर्णयाच्या विरोधात दाद मागू. लुजैनने अधिकारांसाठी आवाज उठविला होता, याची मुभा युवराजांनीच आम्हाला दिली होती असे तिची बहीण लीना यांनी सांगितले आहे. लुजैनला 2014 मध्येही अटक करण्यात आली होती. तेव्हा ती 74 दिवस पोलीस कोठडीत राहिली होती. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दबावामुळे तिची मुक्तता झाली होती.

Related Stories

आगामी काळ खडतर : बायडेन

Omkar B

अफगाणिस्तानातील ‘निडर’ सोशल मीडिया स्टार

Patil_p

सहा महिन्यांचा नीचांक

Omkar B

इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणचा पुन्हा रॉकेट हल्ला; 4 जखमी

prashant_c

ऍलर्जिक लोकांना लस नको

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 20.65 लाखांचा टप्पा

pradnya p
error: Content is protected !!