तरुण भारत

तव मायेच्या मोहें

भगवान महादेव श्रीकृष्णाची स्तुती करताना पुढे म्हणाले – हे प्रभो ! ज्याप्रमाणे सूर्य आपलीच छाया असलेल्या ढगांनीच झाकला जातो आणि तो ढगाला व वेगवेगळय़ा रूपांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आपण स्वयंप्रकाश तर आहातच, परंतु गुणांमुळे जणू झाकले जाता आणि समस्त गुण तसेच गुणाभिमानी जीवांना प्रकाशित करता. वास्तविक आपण अनंत आहात.

ज्या तव मायेच्या मोहें । मोहितबुद्धि झालें देहें ।

Advertisements

पुत्रदारधनादिगेहें । दु:खसागरिं बुडताती ।

आपण देहमात्र झाले । धनसुतवनितागृहें मोहिले ।

तदासक्तीस्तव बुडाले । दु:खसागरिं गुणबद्ध ।

वृजिनार्णव हा परम गहन । यामाजी लोकत्रय निमग्न । उफळताति तळीं बुडून । पुन्हा उफळूनि बुडताती । म्हणाल उफळणें बुडणें कैसें । तरी शुद्धसत्वात्मकर्मवशें ।  देवयोनि पाविजेत असे । उन्मज्जन तें ऊर्ध्वगति । पुन्हा पुण्यक्षयाचे अंतीं। निमज्जन ते अधोगति । तिर्यग्योनीमाजी वसती। ते मज्जती अंधतमीं। वायुपुराणींची संमति । विषर्ययश्च भवति ।  ब्रह्मत्वस्थावरत्वयोरिति । अधोर्ध्वगति परस्परें । ब्रह्मप्राप्ति पावला पूर्ण। म्हणतां पावे आरूढ पतन ।  कर्मक्षयान्ती ऊर्ध्वगमन। तिर्यग्जतु पैं लाहती। कर्मक्षयान्ती तिर्यग्जंतु । निःशेष ऊर्ध्वग ब्रह्मीभूत ।  ब्रह्मनि÷ही विषयासक्त। आरूढ पतित होताती । एवं तव मायामोहित । दु:खार्णवामाजी पतित ।  उन्मज्जत निमज्जत । तें हें समस्त निरूपिलें। एवं समष्टिव्यष्टिकल्प । जीवेश्वरांचें व्यवस्थारूप ।  निरूपूनियां अल्पस्वल्प । अभक्त निष्पाप निंदीतसे ।

भगवान महादेव पुढे म्हणतात – आपल्या मायेने मोहित होऊन लोक स्त्री-पुत्र, देह-घर इत्यादींमध्ये आसक्त होतात आणि पुन्हा दु:खाच्या अथांग समुद्रात गटांगळय़ा खातात.

देवदत्त कोण्ही एक । पूर्वकर्माचा परिपाक ।

भोगवावया तत्प्रेरक । कर्माध्यक्ष जो कां तूं ।

त्याच्या कर्माच्या परिपाकें । अधोगतीचीं भोगिती दु:खें । ऊर्ध्वौन्मज्जनावेशें । दिधलें संतोषें नरदेहा ।

तो हा नरदेह पावूनि मूढ । तव पदकंज न भजे दृढ ।

आत्मवंचक तो शोकारूढ । होवोनि अवघड दु:ख भोगी । किमर्थ शोकारूढ म्हणसी । तरी कारण ऐक इयेविषीं।  अमृत सांडूनि विषातें प्राशी। मूळ दु:खासी तेंचि नव्हे ।

जो मनुष्य हे मानवी शरीर मिळून सुद्धा आपली इंद्रिये ताब्यात ठेवीत नाही आणि तुमच्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही, त्याचे जीवन अत्यंत शोचनीय होय. तो स्वत:च स्वत:ला फसवणारा समजावा.

आत्मा सच्चिदानंदघन । प्रियतम जो तूं ईश्वर पूर्ण ।

त्या तूंतें जो विसर्जून । विपरीत ज्ञान अवलंबी ।

विपरीत ज्ञानें काय केलें । तुज हृदयस्था अंतरविलें ।

इंद्रियीं विषय जे दाविले । सुख भाविलें तद्योगें ।

देह गेह वधू धन क्षेत्र । एवं अवघेंचि दृश्यमात्र ।

सुखार्थ मानूनि हें सर्वत्र । जो होय पात्र क्लेशाचें ।

विपरीतज्ञानें विपरीत केलें । आत्मया हृदयस्था विसरविलें । नश्वरां विषयांतें भजविलें । ऐसें उमजलें त्यां नाहीं । तो मग टाकूनि परमामृता । विषयविषातें होय सेविता । वधूसुत देहगेहां भजतां । शोकावर्तामाजी पडे ।

Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

लाटांशी लढाई…

Patil_p

बेळगावचा ‘गोडवा’ जपण्यासाठी मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी

Patil_p

सर्वसामान्य माणसालाही आपला वाटणारा पहिलाच पंतप्रधान

Patil_p

कारणेन हि जायन्ते……(सुवचने)

Patil_p

एकवटलेल्या आतल्या आवाजाची किमया

Patil_p

पुलंच्या दोन देणग्या

Patil_p
error: Content is protected !!