तरुण भारत

आनंद अकादमी, एआयएमएस सावंतवाडी संघांची विजयी सलामी

12 वर्षांखालील एसीए चषक क्रिकेट स्पर्धा

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित एसीए 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनादिवशी आनंद अकादमी, एआयएमएस सावंतवाडी संघांनी विजयी सलामी दिली. निलेश रणसुबे, सन्मुख, आरव, ऊषम के. यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

भुतरामहट्टी येथे 12 वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ज्ये÷ रणजी क्रिकेटपट्टू नंदकुमार मलतवाडकर, सचिन साळुंखे, प्रशांत लायंदर, आनंद करडी, महेश जवळी, रेगे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात आनंद अकादमीने 20 षटकात 4 बाद 123 धावा केल्या. त्यानंतर दुर्गा स्पोर्ट्स अकादमीला 20 षटकात 5 बाद 92 धावांवर रोखत आनंद अकादमीने हा सामना 32 धावांनी जिंकला. दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखानाने 19.1 षटकात सर्व बाद 103 धावा केल्या. त्यानंतर एआयएमएस क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने 17.4 षटकात 5 बाद 106 धावा जमवित 5 गडय़ांनी विजय मिळविला.

तिसऱया सामन्यात दुर्गा स्पोर्ट्स संघाने 14.5 षटकांत सर्व बाद 47 धावा केल्या. एआयएमएस सावंतवाडीने 4.5 षटकात 1 बाद 49 धावा जमवित 9 गडय़ांनी विजय मिळविला. शेवटच्या सामन्यात आनंद अकादमीने 20 षटकात 3 बाद 166 धावा केल्यानंतर अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखाना संघाला 20 षटकात 9 बाद 111 धावांवर रोखत विजय मिळविला.

Related Stories

जुलैपर्यंतच्या सर्व बॅडमिंटन स्पर्धा तहकूब

Patil_p

ओली पोपचे नाबाद अर्धशतक

Patil_p

संपूर्ण भारतीय पुरूष बॅडमिंटन संघ आयसोलेशनमध्ये

Patil_p

गुणवंत खेळाडूंना केंद्रीय नोकरीची लॉटरी

Patil_p

भारतीय युवा संघाची विजयी सलामी

Patil_p

टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल जैन यांची निवड निश्चित

Patil_p
error: Content is protected !!