तरुण भारत

गोलंदाजांनी साकारला न्यूझीलंडचा विजय

वृत्तसंस्था / माऊंट माँगनुई

शेवटच्या दिवशी अखेरच्या सत्रात गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत पाकिस्तानवर 101 धावांनी विजय मिळवित मालिकेत आघाडी घेतली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला सामनावीराचा बहुमान मिळाला असून विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याची आशा त्याने व्यक्त केली आहे.

Advertisements

विजयासाठी 373 धावांचे आव्हान असताना पाकने 4 बाद 240 अशी मजल मारली होती. पण या धावसंख्येवर मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर उर्वरित पाच गडी आणखी केवळ 31 धावांची भर घालून बाद झाले. शेवटची 4.3 षटके बाकी असताना पाकचा दुसरा डाव 271 धावांत संपुष्टात आला. 3 बाद 71 या धावसंख्येवरून पाकने शेवटच्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला होता.

फवाद आलम आणि कर्णधार रिझवान यांनी निर्धारी खेळ करीत चौथ्या गडय़ासाठी 165 धावांची भागीदारी करीत सामना अनिर्णीत राखण्याच्या दिशेने आगेकूच केली होती. पण 240 धावसंख्येवर काईल जेमीसनने रिझवानला पायचीत करून ही जोडी फोडली आणि नंतर पाकचा डाव आणखी 31 धावांची भर घालत कोलमडला. रिझवान 60 धावा काढून बाद झाल्यानंतर शतक पूर्ण करणारा फवाद आलम 242 या धावसंख्येवर बाद झाला. फवादने 260 चेंडूत 14 चौकारांसह 102 धावा जमविल्या.

यानंतर यासिर शहा शून्यावर, फहीम अश्रफ 19 धावावर बाद झाल्यावर सँटनरने मोहम्मद अब्बास, नसीम शहा यांना बाद करून पाकचा दुसरा डाव संपुष्टात आणला.
शाहीन आफ्रिदी 8 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या साऊदी, बोल्ट, जेमीसन, वॅग्नर, सँटनर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या दोन संघांतील दुसरी कसोटी ख्राईस्टचर्च येथे 3 जानेवारीपासून सुरू होत आहे.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प.डाव 431, पाक प.डाव 239, न्यूझीलंड दु.डाव 5 बाद 180 डाव घोषित, पाक दु.डाव 123.3 षटकांत सर्व बाद 271 : मसूद, अबिद अली, यासिर शहा 0, अझहर अली 38, फवाद आलम 102 (269 चेंडूत 14 चौकार), रिझवान 60 (191 चेंडूत 6 चौकार), फहीम अश्रफ 19 (4 चौकार), अब्बास, नसीम शहा 1, आफ्रिदी नाबाद 8, अवांतर 33. गोलंदाजी : साऊदी 2-33, बोल्ट 2-72, जेमीसन 2-35, वॅग्नर 2-55, सँटनर 2-52.

Related Stories

टोकियो, ओसाका शहरात व्हायरस आणीबाणी जाहीर

Patil_p

सौरभ गांगुलीवर नव्याने अँजिओप्लॅस्टी, प्रकृती ‘स्थिर’

Amit Kulkarni

पाकिस्तानी नागरिकांची आफ्रिदीला सणसणीत चपराक

Patil_p

भारतीय पुरुष, महिला संघांना सुवर्णपदके

Patil_p

संकटावर मात करीत अमित, सोनियाने मिळविली पदके

Patil_p

भारतीय खेळाडू फक्त स्वार्थासाठी खेळायचे

Patil_p
error: Content is protected !!