तरुण भारत

ओट्स कुकीज

साहित्य : पाव वाटी साखर, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी (50 ग्रॅम) अनसॉल्टेड बटर, अर्धी वाटी (60 ग्रॅम) ओट्स, 2 चमचे बेदाणे, 4 चमचे दूध, पाव चमचा दालचिनी पावडर, पाव चमचा व्हॅनिला इसेंस

कृती : साखर मिक्सरला लावून पावडर बनवून घ्यावी. बेकिंग पॅन अथवा ट्रे वर बटर टाकून पसरवावे. ओव्हन 180 डीग्रीवर 15 मिनिटे प्रिहीट करावे. बाऊलमध्ये गव्हाचे पीठ चाळून त्यात बटर बेडक्रम्सप्रमाणे मिक्स करावे. बटर वितळत असल्यास मिश्रण 20 ते 30  मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. आता त्यात साखर पावडर, दालचिनी पावडर आणि व्हॅनिला इसेंस मिक्स करावे. नंतर ओट्स आणि बेदाणे मिक्स करावेत. आता दूध मिक्स करावे. तयार मिश्रण चमचाच्या सहाय्याने बेकिंग ट्रे वर दीड इंच प्रमाणे घालावे. आता ट्रे ओव्हनमध्ये 14 ते 15 मिनिटे ठेवून हलक्या सोनेरी रंगावर कुकीज बेक करावेत. नंतर ओव्हनमधून काढून दोन ते तीन मिनिटे सामान्य तपमानावर ठेवावे. आता तयार कुकीज खाण्यास द्या.

Advertisements

Related Stories

ब्रेड उत्तप्पा

Amit Kulkarni

टोमॅटो ग्रेव्ही

tarunbharat

दम पनीर

Omkar B

डाळ मसाला वडा

Omkar B

मस्त मिल्क केक

Omkar B

झटपट चविष्ट डिश

tarunbharat
error: Content is protected !!