तरुण भारत

संचयनी चौकाला डॉ.आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

संचयनी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि या चौकाला डॉ. आंबेडकराचे नांव देण्याची मागणी दलित संघटनांनी केली आहे. याबाबत कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱयांनी महापालिकेला पाठविले आहे.  मात्र सदर चौक कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येत असल्याने नामकरण करण्याबाबत महापालिकेसमोर पेच निर्माण झाला आहे.

Advertisements

शहरातील विविध चौकांचे आणि रस्त्यांचे नामकरण यापूर्वी करण्यात आले आहे. राणी चन्नम्मा चौकाजवळील मनपा उद्यानाला आणि येथील रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले असून उद्यानात पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच महापालिका कार्यालय आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सदाशिवनगर, आंबेडकर नगर येथील समाजभवन आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून आंबेडकर भवन असे नाव देण्यात आले आहे. खासबाग येथील चौकालाही नांव देण्यात आले आहे. शहरातील विविध चौकात आणि खुल्या जागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

तसेच संचयनी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि या चौकाला डॉ. आंबेडकर यांचे नांव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन दलित संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे देण्यात आले आहे. सदर नामकरणाबाबत आवश्यक कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी महापालिकेला पत्र पाठवून केली आहे. मात्र सदर चौकाचा परिसर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येत असल्याने नामकरणाबाबत महापालिकेला कोणताच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे नामकरण करण्याबाबत कारवाई कशी करायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

नामकरण किंवा चौकाचे नामकरण करण्यासाठी संबंधित खात्याकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी या चौकाच्या नामकरणाचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डकडे देण्यात आला होता. पण या प्रस्तावावर अद्याप कोणताच निर्णय झाला नाही.

 त्यामुळे दलित संघटनेच्या मागणीची पुर्तता होणार का? असा मुद्दा निर्माण झाला आहे.

Related Stories

गर्लगुंजीत शनिवारी भव्य कब्बडी स्पर्धा

Amit Kulkarni

रेशीम, सुती साडय़ांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Patil_p

परतीच्या दमदार पावसाने तारांबळ

Patil_p

आता पूर्णवेळ भरल्या शहरातील प्राथमिक शाळा

Amit Kulkarni

संकेश्वरकरांवर कोरोनानंतर डेंग्यू संकट

Patil_p

पहिल्या डोससाठी मुलांची झुंबड

Patil_p
error: Content is protected !!