तरुण भारत

कार-ट्रकच्या भीषण धडकेत पती-पत्नीसह तिघे ठार

सौंदत्ती-धारवाड रस्त्यावरील दुर्घटना : मृत दांपत्य सौंदत्तीचे

वार्ताहर / बाळेकुंद्री

Advertisements

कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव समोरून येणाऱया ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सौंदत्ती शहरातील पती-पत्नीसह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. हा अपघात सौंदत्तीहून धारवाडकडे जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावरील बुद्धिगोप्प गावाजवळ घडला.

हुबळी येथील ईस्पिळात डायलेसिसाठी जात असतानाच काळाने घाला घातल्याने इचंगी कुटुंबासह सौंदत्ती शहरावर शोककळा पसरली आहे. रस्त्याचा अंदाज न आल्याने कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. रेवणसिद्यय्या इचंगी (वय 46)  तर विजया इचंगी (वय 42) असे मयत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. व नागराज इचंगी (वय 30) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत नागराज हा रेवणसिद्यय्या यांचा लहान भाऊ होय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचंगी कुटुंब हे बुधवारी सकाळी आपल्या कारमधून विजया हिला डायलेसीस करून घेण्यासाठी सौंदत्तीमार्गे धारवाडला जात होते. याचवेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱया ऊसाची वाहतूक करणाऱया ट्रकला जोरदार धडक दिल्याने कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. कारची धडक इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

पीएफ-ईएसआय कार्यालये बेळगावात स्थापन करा

Amit Kulkarni

साडेतीन तोळय़ाचे गंठण असलेली पर्स पळविली

Patil_p

निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात चोरी

Omkar B

अलतगा येथे शाळा दोन सत्रात भरविण्याचा निर्णय

Patil_p

उत्तर कर्नाटकच्या मुद्दय़ांवर सत्ताधाऱयांनी दाखविला ठेंगा

Amit Kulkarni

जिजामाता बँक अध्यक्षपदी अश्विनी बिडीकर तर जयश्री भोसले उपाध्यक्षा

Patil_p
error: Content is protected !!