तरुण भारत

रांगोळी येथील लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर


हुपरी / वार्ताहर :


रांगोळी (ता.हातकणंगले)येथील लोकनियुक्त सरपंच नारायण दत्तात्रय भोसले यांच्यावरील अविश्वास  ठरावाचा निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.बुधावर30 रोजी घेण्यात आलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत ठरावाच्या बाजूने 868 मते तर ठरावाच्या विरुद्ध 1104 मते पडली यामध्ये 236 मतांनी सरपंचांवरील अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याची माहिती अध्यासी तथा गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी दिली.यावेळी सरपंच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव  साजरा केला. मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


14 सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव संमत झाला होता.लोकनियुक्त सरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेची संमती लागते.ग्रामसभा कधी होणार याची प्रचंड उत्सुकता होती.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 30 डिसेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या पंधरा दिवसापासून राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सोशल मीडिया, प्रसिद्धी पत्रके या माध्यमातून एकमेकावर आरोप प्रत्यारोप वातावरण चांगलेच तापले होते.14 सदस्यां विरुद्ध सरपंच या निर्णयाक सामना काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.सकाळपासून मतदान केंद्रावर नाव नोंदणी साठी मोठी गर्दी होती.5237एकूण मतदानापैकी 2135 मतदारांनी नोंदणी केली,त्यापैकी 2053 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी 81 मते अवैध ठरली तर 1972 वैध्य मतांपैकी अविश्वास ठरावाच्या विरोधात 1104 मते तर ठरावाच्या बाजूने 868 मते मिळाली यामध्ये 236 मतांनी सदरचा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अतिशय नेटके नियोजन करण्यात आले होते.यावेळी मंडळ अधिकारी ए. डी. पुजारी,तलाठी एस. ए. गवंडी, ग्रामविकासाधिकारी प्रकाश करडे उपस्थित होते. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात महिलेसह 11 पॉझिटिव्ह

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने दोघांचा बळी

Shankar_P

खाजगी सावकारीतून मित्रालाच ठार मारण्याची धमकी

triratna

कनाननगर येथील तरूण कोरोना पॉझिटिव्ह

triratna

बेफिकीर प्रशासन : शिरढोणमध्ये कोरोना मृतांच्या घरी आठ दिवस निर्जंतुकीकरण नाही

triratna

सीपीआरमध्ये बाह्यरूग्ण तपासणी सुरू

triratna
error: Content is protected !!