तरुण भारत

वाहनचालकांना दिलासा, फास्टॅगसाठी मुदतवाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येणार आहे. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे. 

Advertisements


केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतू मुक्तता व्हावी यासाठी चारचाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केले होते. परंतु वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घोषणा केली होती की, 1 जानेवारी 2021 पासून देशाचे सर्व राष्ट्रीय मार्गांवरील टोलनाके कॅशऐवजी फास्टॅग लेनमध्ये रुपांतरीत होती. जर एखादा वाहनचालक फास्टॅगशिवाय टोलनाक्यावर आला तर त्याला दुप्पट टोल द्यावा लागेल. परंतु आता फास्टॅग घेण्यासाठी आणि लावण्यासाठी वाहनचालकांना दीड महिन्यांची मुदत मिळाली आहे.


सध्या फास्टॅगद्वारे टोलनाक्यावरील वसुली 75 ते 80 टक्के आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून सल्ला दिला आहे की,त्यांनी 100 टक्के कॅशलेस टोल वसुलीसाठी आवश्यक मंजुरी घेऊन ते 15 फेब्रुवारीपासून लागू करावे. 

Related Stories

राज्यात 10 नवे रुग्ण

Patil_p

पैलवान ते डॉक्टरेट – एक प्रेरक प्रवास

Patil_p

चीनमध्ये कोरोना नियंत्रणात

tarunbharat

कोरोनावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

tarunbharat

भारतात 24 तासात साडेचौदा हजार नवीन कोरोना रुग्ण

datta jadhav

दिल्लीत महिन्यात तिसऱयांदा भूकंप

Patil_p
error: Content is protected !!