तरुण भारत

पसरणी घाटात बस उलटून पंधरा जखमी

प्रतिनिधी / वाई

पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे अवघड वळणावर बस उलटून १५ प्रवासी जखमी झाले. चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड महाबळेश्वर ला खाजगी बसने आली होती. बस मध्ये ३४ प्रवासी होते.

आज सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला असताना पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवल पालखी रस्त्यावर अवघड वळणावर उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे खाजगी बस क्रमांक (एम एच १४सीडब्लू४७६४) रस्त्यावरच उलटली .चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवित हानी घडली असती.

यामुळे बस मधील प्रवासामध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत .अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

सातारा : कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा

datta jadhav

रयतच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Patil_p

साताऱयातील व्यावसायिकाची 23 लाखाची फसवणूक

Amit Kulkarni

कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांची सेवा सुरु ठेवा

datta jadhav

कास पठारवर जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी लुटला निसर्गाचा आनंद

Abhijeet Shinde

सातारा : आनेवाडी टोल नाका प्रकरणी सुनावणीसाठी खा.उदयनराजे वाई न्यायालयात हजर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!