तरुण भारत

कडोलीत बहुमतासाठी करावी लागणार कसरत

वार्ताहर/ कडोली

कडोली ग्राम पंचायतीच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित ग्राम विकास आघाडी आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी जोराची टक्कर झाली असून सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला अपक्षांची साथ मिळणार? याकडे साऱया परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisements

कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात कडोली, जाफरवाडी, देवगिरी आणि गुंजेनहट्टी गावचा समावेश असलेल्या 8 प्रभागात ग्राम विकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोराची टक्कर झाल्याचे मतमोजणीद्वारे स्पष्ट झाले. बुधवारी मतमोजणीसाठी फार वेळ लागल्याने रात्री उशिरा निकाल बाहेर पडले. विजयी उमेदवार रात्री 11 ते 12 वाजता गावात हजर झाल्यानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्मयांची आतषबाजी करून जल्लोष केला.

एकूण 27 जागांपैकी ग्राम विकास आघाडीला 11 आणि भाजपला 13 जागा मिळाल्या असून 3 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नाही. आता बहुमतासाठी दोन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. विजयी उमेदवार खालीलप्रमाणे-

वॉर्ड नं. 1- संजय नारायण जाधव, प्रतिमा विनोद पाटील, दत्ता सुतार, संजय कांबळे, वॉर्ड नं. 2- सागर मोहन पाटील, प्रभावती भाऊराव पाटील, नागेश बाबुराव बांदिवडेकर, संगीता शंकर चिंचनगी, वॉर्ड नं. 3- राजू गणपती कुटे, सुनील आप्पय्या पावणोजी, लक्ष्मी शिवाजी कुटे, प्रेमा रायाप्पा नरोटी, वॉर्ड नं. 4- सिद्दाप्पा शहापूरकर, दीपा दीपक मरगाळे, भारती शिवाजी चव्हाण, वॉर्ड नं. 5- राजू मायाण्णा, सुरेखा बाळू पवार, वैशाली कल्लाप्पा बिजगत्ती, वॉर्ड नं. 6- लक्ष्मण गौंडवाडकर, शोभा परशराम पाटील, रेखा कल्लाप्पा नरोटी, वॉर्ड नं. 7- प्रभू कुंबरगी, रेखा राजू सुतार, मंजुळा निंगाप्पा अंकी, वॉर्ड नं. 8- गौडाप्पा पाटील, बाळू सिद्राय बडीगेर, श्रीदेवी वैजनाथ पाटील.

गौडाप्पा पाटील तिसऱयांदा विजयी

कडोली ग्राम पंचायतीच्या वॉर्ड नं. 8 मधून गौडाप्पा पाटील हे सतत तिसऱयांदा निवडून आले आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मनमिळावू स्वभाव आणि विकासकामे राबवून घेण्यासाठी त्यांची होणारी धडपड यामुळे ते मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत.

Related Stories

दुपारी बारापर्यंत रस्ते खुले करा

Amit Kulkarni

आंबेवाडीत मसणाई मंदिराचे भूमिपूजन

Patil_p

मंदिराच्या जागेवरून रणकुंडयेत तणाव

Amit Kulkarni

तिढा सुटता सुटेना; कर्मचारीही ठाम

Amit Kulkarni

खोका देवगडचा, आंबा मात्र धारवाडचा

Rohan_P

फॉर्म हाऊसवर झोपलेल्या वॉचमनचा खून

Rohan_P
error: Content is protected !!