तरुण भारत

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने मानले आभार

प्रतिनिधी/ बेळगाव

तालुक्मयातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. तालुक्मयात कोणतीही अनुचित घटना किंवा प्रकार घडला नाही. उमेदवार आणि मतदारांनी चांगली साथ दिली असून त्या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत. तालुका आचारसंहिता नोडल अधिकारी आणि तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी हे आभार मानले आहेत.

Advertisements

यावेळी ग्राम पंचायतीसाठी मोठय़ा चुरशीने निवडणूक झाली आहे. ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया अनेकांनी बाजी मारली आहे. विजयी पताका घेऊन त्यांनी विकासाच्या ध्येयाने कामाला लागावे. याचबरोबर जे पराभूत झाले आहेत, त्यांचाही विकासासाठी हातभार महत्त्वाचा आहे. निवडणूक झाली, त्यामुळे इर्षा आणि इतर सर्व मतभेद विसरून गावच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कलादगी यांनी केले आहे.

बेळगाव तालुक्मयातील 55 ग्राम पंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यांचा निकालही लागला आहे. त्यामुळे आता विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करणे ही काळाची गरज आहे. दि. 22 व 27 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 30 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली आहे. या काळात कोणत्याही प्रकारे तालुक्मयात अनुचित प्रकार अथवा आचारसंहिता भंग झाली नाही. ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली आहे. ज्यांनी विजय मिळविला आहे त्यांनी पराभूत उमेदवारांना बरोबर घेऊन विकास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रक्रियेत तालुक्मयातील नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी असून यापुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Related Stories

जिमखाना रेड, विजया सीए संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

निपाणी बीसीपीएसच्या उपनिरीक्षकपदी अनिता राठोड रुजू

Patil_p

केएलईमध्ये हृदयरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

खड्डे चुकविताना टँकर कलंडला

Patil_p

मुचंडी येथे तरुणाला मारहाण

Patil_p

व्हर्सटाईल ग्रुपचे चेअरमन प्रभाकर जनवाडकर यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!