तरुण भारत

लोकमान्यची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा संपन्न

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिराच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर होते.

Advertisements

प्रारंभी मागील वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन करण्यात आले. 2019-20 आर्थिक वर्षाचा ताळेबंद आणि नफा, तोटा पत्रकाचे वाचन झाले. संस्थेचे ऑडीटर व सीए अविनाश दीक्षित यांनी लेखा परीक्षण अहवाल सादर केला. मागील वर्षांत संस्थेने 11 कोटी 29 लाख रुपयांचा नफा मिळविला, याची माहिती यावेळी देण्यात आली.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी पुढील आर्थिक वर्षातील संकल्प आणि उद्दिष्टांची माहिती दिली. कोरोनामुळे जगावर संकट असतानाही सातत्याने सेवेत राहून संस्थेने प्रगती केली आहे. या प्रगतीत कर्मचारी, सर्व संचालक, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे, संचालक प्रसाद ठाकुर, गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, सेवंतीभाई शाह, विठ्ठल प्रभू, प्रभाकर पाटकर, अनिल चौधरी, संचालिका गायत्री काकतकर, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समन्वयक विनायक जाधव यांनी केले.

Related Stories

खानापुरात शनिवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Rohan_P

रजनीकांत यांनी पुरस्कार अर्पण केलेले राज बहादूर आहेत तरी कोण?

Abhijeet Shinde

अनगोळ काळा तलावाचे अस्तित्व धोक्यात

Amit Kulkarni

केएलईमध्ये नव्याने नेत्रचिकित्सा विभाग सुरू

Amit Kulkarni

‘त्या’ विद्युत खांबाची अखेर दुरुस्ती

Amit Kulkarni

कोरोना काळातही खरेदी-विक्रीतून सरकारला 4 कोटी 54 लाखाचा कर

Patil_p
error: Content is protected !!