तरुण भारत

पसरणी घाटात बस उलटून पंधरा जखमी

प्रतिनिधी/ वाई

पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे अवघड वळणावर बस उलटून 15 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडली. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही.

Advertisements

चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱयांची वार्षिक सहल प्रतापगड महाबळेश्वरला खाजगी बसने आली होती. बसमध्ये 34 प्रवासी होते. आज सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला असताना पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ पालखी रस्त्यावर अवघड वळणावर उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटल्यामुळे खाजगी बस क्रमांक (एम एच 14सीडब्लू4764) रस्त्यावरच उलटली.

मात्र यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवितहानी घडली असती. यामुळे बस मधील प्रवासामध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Related Stories

सातारा तालुक्यात निवडणुकीचे अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी

datta jadhav

सातारा : हरिहरेश्वर बँकेत 37 कोटी 46 लाखांचा गैरव्यवहार, 29 जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पुढील विधानसभा स्वतंत्रपणे लढवून दाखवा

Abhijeet Shinde

‘भजे खायचे, गुलाबजाम खायचे ही राज्याची घातक प्रवृत्ती’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 15,229 नवे रुग्ण; 307 मृत्यू

Rohan_P

कोरोनामुळे शाळा पडली बंद; शिक्षकाने सुरू केला गांजा तस्करीचा व्यवसाय

Rohan_P
error: Content is protected !!