तरुण भारत

फलटणच्या युवकाला अडकवले हनी ट्रपमध्ये

बलात्काराच्या खोटय़ा गुह्यात अडकवण्याची धमकी : एक लाखाची खंडणी मागितली

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

फलटण येथील युवकास एका युवतीने महाबळेश्वरला फिरायला जावू असे व्हॉट्सऍपवरुन कॉल करुन बोलवून घेवून हनी ट्रप केला. पाचगणीतल रिव्हर पॅलेस हॉटेलमध्ये थांबवून खोटय़ा बलात्काराच्या गुह्यात अकडवू, एक लाख रुपये दे, असे म्हणून मारहाण केली. त्याप्रकरणी एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाचगणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शार्दुल खलाटे (वय 22, रा. बिरदेवनगर फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि,. 30 रोजी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास फलटणमध्ये सध्या रहात असलेल्या पुण्यातील युवतीने शार्दूल यांना व्हाट्सऍपवरुन कॉलकरुन आपण दोघे महाबळेश्वरला फिरायला जावू, मस्तपैकी एन्जाय करु, अशी भुरळ घातली. त्यामुळे शार्दुल याने तिला गाडीत घेवून महाबळेश्वरला घेवून निघाला.

 गाडीमध्येच तिने पाचगणीत थोडे थांबू, पाचगणी पाहू अन् पुढे जावू असे सांगितले. त्यानुसार शार्दुल याने गाडी हॉटेल रिव्हर पॅलेस येथे थांबवली. हॉटेलच्या रुममध्ये बॅग ठेवून ओळखपत्र देवून तासभर रुममध्ये थांबून दोघे बाहेर आले. तोच हॉटेलच्या परिसरात मारुती दिलीप शेलार, अमोल भिमा यमपुरे, सुरज शिवाजी देवकर (सर्व रा. फलटण) हे तेथे आले. त्यांनी पार्किंगमध्ये दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

तुला बलात्काराच्या गुह्यात अडकवितो असे सांगून 1 लाख रुपये खडणीची मागणी केली. तू आम्हाला पैसे देत नसशील तर तुला पोलीस स्टेशनला अडकवतो असे सांगून दमदाटी केली. तसेच सोबत आलेल्या युवतीनेही तू त्यांना पैसे दे नाहीतर तुला मी खोटय़ा बलात्काराच्या गुह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यावरुन त्या युवतीसह मारुती शेलार, अमोल यमपुरे, सुरज देवकर यांच्यावर गुन्डा दाखल झाला आहे. या गुह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम हे करीत आहेत.

Related Stories

पोलीस, होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी चौघे ताब्यात

Patil_p

१४ ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून ओळखला जाणार; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abhijeet Shinde

पश्चिम भागात पावसाचा जोर

Patil_p

मुख्यमंत्र्यांसाठी राज्यपालांकडे ईमेलचा भडिमार

Abhijeet Shinde

प्रांत कार्यालय परिसरात अस्वच्छेमुळे प्रचंड दुर्गंधी

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!