तरुण भारत

रक्तदाबाचा त्रास कसा ओळखाल ?

सामान्यपणे कमाल रक्तदाब 120 आणि किमान 80 हा आकडा सामान्य समजला जातो. पण ही आकडेवारी कमी-जास्त असेल, तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे, हे वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण रक्तदाबाची मोजणी न करताही आपल्याला हा त्रास जडलेला ओळखायचे कसे?

  • यासाठी डोक्याच्या मागच्या बाजूला दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. विनाकारण खूप ताण आल्यासारखं जाणवलं, तर नजर ठेवा, कारण हे देखील रक्तदाब वाढीचं महत्वाचं कारण आहे. ते वेळीच ओळखा.
  • दीर्घकाळ चक्कर आल्यासारखे होत आहे का, तर या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडेसे काम केल्यावर तुम्हाला खूप जास्त थकवा आला आहे, असं वाटत असल्यास रक्तदाबाचा त्रास असू शकतो.
  • श्वास घेण्यामध्ये अडचण येत असतील तरीही तुम्हाला रक्तदाब असण्याची शक्यता असते. शिवाय नाकातून रक्त येणे ही पण उच्च रक्तदाबाची समस्या आहे.  निद्रानाश हेही रक्तदाबाचेच एक लक्षण आहे.

Related Stories

बॉटल एक्सरसाईज !

Omkar B

नेब्युलायजरची संजीवनी

Omkar B

प्रदुषणानं घटतंय आयुर्मान

Omkar B

फायदे चक्रासनाचे

tarunbharat

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

Omkar B

सांभाळा गॅस्ट्रोपासून

Omkar B
error: Content is protected !!