तरुण भारत

स्मरणशक्ती आणि पुरेशी झोप

माणसाचं आरोग्य उतारवयात निरोगी आणि उत्तम असेल, तर माणसाची स्मरणशक्ती अगदी त्या वयालाही चांगली असते आणि आकलनाची प्रक्रिया अगदी उतारवयातही मेंदूपाशी सतेज शिल्लक असते.

  • मेंदूच्या या क्षमतेला ‘न्यूरोप्लास्टिसीटी’ असं म्हणतात.
  • स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती या दोन्ही गोष्टी म्हणजे मानवी मेंदूला मिळालेलं वरदान आहे. त्यामुळे दोन गोष्टी टिकवायच्या आणि वाढवायच्या असतील, तर त्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे.
  • मेंदूच्या आरोग्यासाठी व्यायाम आणि पुरेशी झोप यांची गरज असते. मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या आजारांमुळे मेंदूला होणार्या रक्त आणि प्राणवायूच्या पुरवठय़ामध्ये घट होऊ शकते.
  • तसं झालं तर मेंदूची कार्यक्षमता कमी होऊन स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे व्यायामाने रक्त आणि प्राणवायू यांचा योग्य पुरवठा मेंदूला झाला की, स्मरणशक्ती दीर्घकाळापर्यंत चांगली राहू शकते.
  • आपण झोपलेलो असताना दिवसभरातल्या घटनांचा आढावा घेण्याचं काम मेंदूकडून होतें असतं.
  • या आढाव्यानंतर जुन्या घटनांची तर्कसंगती आपल्याला लागते, त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
  • म्हणूनच पुरेशी आणि गाढ झोप ही स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक असते.

Related Stories

एमएमआर लसः नवा दिलासा ?

Omkar B

उपचार डोळ्यांच्या टय़ुमरवर

Omkar B

ओळखा कातडीचा कर्करोग

Omkar B

प्रदुषणानं घटतंय आयुर्मान

Omkar B

कोरोना काळात उपयुक्त गॅजेट

Omkar B

कोरोना आणि भाजीपाला

Omkar B
error: Content is protected !!