तरुण भारत

सांगेत ऊस उत्पादकांचे उद्यापासून धरणे आंदोलन

प्रतिनिधी
सांगे
ऊस उत्पादक संघर्ष समिती, गोवातर्फे सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले असून सरकारला दहा दिवसांची मुदत दिली होती. पण अद्याप लेखी आश्वासन न मिळाल्याने शनिवार 2 पासून सांगे येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष चंदन उनंदकर यांनी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार पाfरषदेत दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष कुष्ट गावकर, बाबुलो गावकर व सांतान हजर होते. सरकारने अजूनपर्यंत शेतकर्‍यांकडे लेखी करार केलेला नाहि.

ऊस उत्पादकांची मागणी आहे की, रु. ३००० प्रति टनऐवजी रु. ३६०० नुकसान भरपाई देण्यात यावी. कारण एकीकडे महागाई वाढत आहे. ऊस उत्पादक संघटना सरकारला साथ देत असून सरकारबरोबर आहे. पण शेतकर्‍यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विषय लावून धरत नाहि. त्यामुळे वाडे-सांगे येथे २० डिसेंबर रोजी ऊस उत्पादकांची बैठक होऊन सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले. पण अजूनहि लेखी उत्तर सरकारने दिलेले नाहि, असे उनंदकर यांनी सांगितले. त्यामुळे २ पासून जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाहि तोपर्यंत बेमुदत धरणे धरण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारला दिलेली दहा दिवसांची मुदत १ रोजी संपत आहे. या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार तसेच जे राजकारणी २०२२ ची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी टप्याटप्याने उपस्थिती लावावी, असे आवाहन उनंदकर यांनी केले आहे.

Related Stories

निदान मतदारसंघातिल खाण अवलंबिता वर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे।

Patil_p

आम्ही खेडेगावात राहिलो ही आमची चुक आहे ?

Patil_p

शाळा सुरु करण्यास पालक, मंत्री, आमदारांचा विरोध

Patil_p

नानोडा येथील वैशिष्टय़पूर्ण घोडेमोडणी आज

Amit Kulkarni

पर्यटक टॅक्सीवाले वाट्टेल तसे पैसे उकळतात

Amit Kulkarni

म्हार्दोळात कोरोना निगा केंद्राला पाच पंचसदस्यांचा विरोध

Patil_p
error: Content is protected !!