तरुण भारत

मध्यप्रदेश मंत्रिमंडळ विस्तार; सिंधियांच्या ‘या’ समर्थकांना मिळणार संधी

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान सरकारचा  मंत्रिमंडळ विस्तार 3 जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता होऊ शकतो. राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक तुलसी सिलावत आणि गोविंदसिंह राजपूत यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने म्हटले आहे. 

Advertisements

मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी राजभवनाला मंत्रिमंडळ विस्ताराची नोटीस पाठवली आहे. मध्यप्रदेशचे सरन्यायाधीश मोहम्मद रफिक यांचाही शपथविधी सोहळा रविवारी दुपारी तीन वाजता राजभवनात होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यापासून शिवराज सिंह यांना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा होती. त्यासाठी मुख्यमंत्री चौहान, प्रदेश अध्यक्ष व्हीडी शर्मा आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चार बैठका घेतल्या. शुक्रवारी सकाळी या नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी दिली आहे.

Related Stories

मॉडर्ना लसीला भारतात अनुमती

Patil_p

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

कोल्हापूर सोमवारपासून अनलॉक होणार, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत

triratna

आनंदवार्ता : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापरासाठी मिळाली परवानगी

triratna

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर समर्थकाची आत्महत्या

triratna

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.25 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!